उलगडला संगीताचा भव्य पट

Basant_Kabra
Basant_Kabra

पुणे - महोत्सवात या वर्षी पाच दिवसांमधील २७ प्रस्तुतीमधून ३२ कलावंतांनी आपली कला सादर केली. यांपैकी वीस गायक, दहा वादक व दोघे नर्तक होते. पाच जोड्यांनी सहगायन, सहवादन, नृत्याच्या माध्यमातून परस्परांशी कलात्मक एकरूपतेचा अनुभव दिला.सनई व बासरी ही सुषीर वाद्यं अर्थात हवेची फुंक वापरून वाजणारी वाद्यं प्रत्येकी एक, तंतुवाद्यांपैकी संतूर, सरोद, सतार सरस्वतीवीणा, प्रत्येकी एक, व्हायोलिन तीन व नृत्य दोन कलावंतांनी सादर करून जिंकून घेतलं. ग्वाल्हेर, पतियाळा, आग्रा, जयपुर, बनारस, किराणा, मेवाती, मैहर, सेनिया, इटावा व हांडिया या घराण्यांची परंपरागत वैशिष्ट्यपूर्ण अभिव्यक्ती मोहवत राहिली. 

दुपार, संध्याकाळ, रात्रीच्या पहिल्या व दुसऱ्या प्रहरी गायले जाणारे  तसंच समयचक्र ओलांडून इतर वेळीही गायले जाणारे हिंदुस्तानी आणि कर्नाटकी राग सलग ऐकायची संधी मिळाली. त्यांत शुद्ध सारंग, गौड सारंग, मधुवंती, भीमपलास, श्री, पूरिया धनाश्री, पहाडी, गावती, गोरख कल्याण, कौशी कानडा, हमीर, मुलतानी, पटदीप, बिहाग, वाचस्पती, जनसंमोहिनी, झिंझोटी, मारवा, भूप, बसंतबहार, हंसध्वनी, चारूकेशी, पूर्वी, शुद्ध बराडी, लाजवंती आदी रागांची सुश्राव्य मेजवानी होती.

ग्रीनरूममधील लगबग
यंदाचं महोत्सव स्थळ एवढं प्रशस्त आहे की, स्वरमंचापासून ग्रीनरूम बऱ्याच अंतरावर आहे. तिथं कलावंत सज्ज होत. गाऊन आवाज तापवत. मग चारचाकीतून त्यांना मैफिलीच्या जागी आणलं जाई. शेवटच्या दिवशी दुसरी प्रस्तुती अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी याबहिणींच्या सहगायनाची होती. आवाज तापवून झाल्यावर या दोघी एकमेकींची वेशभूषा, आभूषणं नीटनेटकी करत होत्या. समाधान झाल्यावर दोघींनी  "ओक्के" म्हणत गालात हसत, टाळी दिली आणि निघाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com