स्मार्ट कुकिंगसाठी स्मार्ट ऍप्स

स्मार्ट कुकिंगसाठी स्मार्ट ऍप्स
स्मार्ट कुकिंगसाठी स्मार्ट ऍप्स

नोकरदार महिलांना आपले आयुष्य वेगवान सुखकर करण्यासाठी वेगवेगळी ऍप्स उपयोगी पडू शकतात. स्मार्टफोनमुळे हौशी -गौशी सगळ्या शेफसाठी ही ऍप्स अतिशय उपयुक्त आहेत. त्याचा उपयोगदेखील स्मार्टपणे करून आपले आयुष्य सुखकर होऊ शकते. व्हॉट्‌स ऍप, फेसबुक, स्काइप यांचा वापर बऱ्याच स्त्रिया करतात, पण दैनंदिन आयुष्यात आरोग्याशी निगडीत तसेच कुकिंगविषयी इतरही ऍप्स महत्वाची भूमिका बजावू शकतात. 

CookWizMe : 
गृहिणी तसेच प्रत्येक नोकरदार महिलेला आज स्वयंपाकात कोणती भाजी करायची हा प्रश्‍न असतोच. घरामध्ये लहान मुल असल्यास रोज नवे काही तरी त्यांना खायचे असते. हा प्रश्न सोडविण्यासाठी "कूकविझ मी‘ हे ऍप नक्की मदत करू शकेल. या ऍपमध्ये तुम्हाला रोज नवी रेसिपी आणि त्याबद्दलची माहिती देखील मिळू शकते. याशिवाय तुमची एखादी रेसिपी यावर अपलोड करून ठेवू शकता. दोन रेसिपी एकदम अपलोड करायच्या नसतील तर एक ड्राफ्टमध्ये ठेवू शकता. याशिवाय रेसिपीचा व्हिडिओ, फोटोजदेखील अपलोड करण्याची सोय यामध्ये दिली आहे. तुम्ही जर आयफोन वापरत असाल तर हे ऍप नक्की डाऊनलोड करा. 

लंच बॉक्‍स : तुमच्या घरात जर शाळेत जाणारी मुले असतील तर हे ऍप नक्की मदत करेल. लहान मुलांना रोज यम्मी रेसिपीज केलेल्या आवडतात त्यासाठी हे ऍप नक्की डाऊनलोड करा. हे एक पेड ऍप केवळ ऍन्ड्रॉईड ओएससाठी उपलब्ध आहे. मुलांना आवडतील अशा टेस्टी- हेल्दी रेसिपीजचा खजिना यावर पाहायला मिळतील. या ऍपचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व रेसिपीज अवघ्या 15 ते 30 मिनिटांत पूर्ण होणाऱ्या आहेत. तसेच यांत नाविन्यपूर्ण असे क्‍युझेन्सचे पर्याय उपलब्ध आहेत. इटालियन, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, फ्युजन असे विविध प्रकार आहेत. या रेसिपीजपैकी तुम्हाला लवकरच ट्राय करायची असल्यास ती रेसिपी "फेवरेट‘ म्हणून टॅग करून ठेवू शकता. या ऍपला तुमच्या सारख्या स्मार्ट युजर्सनी 4.6 स्टार असे रेटिंग दिले आहे. 

सिंपली ऑरगेनिक 
डाएट पाळणाऱ्या व्यक्तींसाठी हे ऍप म्हणजे पर्वणीच आहे. ऑरगॅनिक जीवनशैलीचा निश्‍चय केला असल्यास हे ऍप तुम्हाला नक्की मदत करेल. कारण सिम्पली ऑरगॅनिक हे ऍप केवळ ऑरगॅनिक खाद्यपदार्थांच्या रेसिपीजची तुम्हाला माहिती देते. याशिवाय तुम्ही सुध्दा एखादा ऑरगॅनिक पदार्थ वापरून केलेली रेसिपी यावर शेअर करू शकता. या रेसिपीचे उत्तम दर्जाचा फोटो काढून शेअर करता येतात. या रेसिपीसाठी खास टिप्स, ट्रिक्‍सचा यांत समावेश करता येतो. पुढील आठवड्याचा मेन्यू आखून यांत सेव्ह करण्याची सुविधा यात आहे. हा मेन्यू प्लान केल्यावर त्यातील प्रत्येक रेसिपीत किती पोषण मूल्य आहेत हे देखील ऍप दर्शवते. हे ऍप केवळ आयओएसकरिता मोफत उपलब्ध आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com