भटकंती: ही 'ट्रॅव्हल गॅजेट्‌स' तुमच्याकडे आहेत?

ही 'ट्रॅव्हल गॅजेट्‌स' तुमच्याकडे आहेत?
ही 'ट्रॅव्हल गॅजेट्‌स' तुमच्याकडे आहेत?

दिवाळी व्हेकेशन म्हटले की, पहिल्यांदा प्लॅनिंग सुरू होते ते म्हणजे पर्यटनाला कुठे जायचे? जंगल कॅम्प, बेस कॅम्प, सुंदर पर्यटनस्थळे, मनोरंजन पार्क असे भरपूर पर्याय दिसू लागतात. 
मात्र, स्थळ निश्‍चित झाले तरी सामानामध्ये नेमके काय-काय घ्यावे, हे ठरलेले नसते. आजच्या टेक्‍नोसॅव्ही युगात ट्रॅव्हल डेस्टिनेशननंतर कपडे, अॅक्‍सेसरीजबरोबर गॅजेटस्‌ची लिस्ट केली जाते. या गॅजेट्‌सच्या लिस्टमधील काही वस्तू तुमच्याकडे नक्कीच असतील. त्यामध्ये पुढील वस्तू असल्याची खात्री करून घ्या. 

पॉवर बॅंक : स्मार्टफोन, लॅपटॉपचा वापर वाढल्याने त्याला अधिक ऊर्जा पुरविणारे, आपत्कालीन स्थितीत बॅटरी संपल्यावर चार्ज करण्यासाठी पॉवर बॅंक अतिशय उपयुक्त ठरते. बाजारात सध्या वॉटरप्रूफ पॉवर बॅंकही उपलब्ध आहेत. या पॉवर बॅंक त्यांच्या क्षमतेनुसार चारशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत मिळतात. 

कॅमेरा : कोणत्याही लहान - मोठ्या टूरसाठी कॅमेरा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट वस्तू आहे. निकॉन, कॅनन, सोनी यांसारख्या नामांकित कंपन्यांचे उत्तम डिजिटल, एस आर एल कॅमेरे, लेन्स बाजारात उपलब्ध आहेत. अर्थातच, या कॅमेरांच्या किमती फीचरनुसार वेगवेगळ्या आहेत. 

मल्टिपोर्ट असलेला चार्जर : पॉवर बॅंकनंतर दुसरी प्रायोरटी असते ती म्हणजे चार्जर. यासाठी बाजारात दोनपेक्षा जास्त पिनांचा संच असलेला चार्जर मिळतो. हा मल्टीपोर्ट चार्जर ऑनलाइन तसेच मोबाईलचे सुटे भाग मिळणाऱ्या दुकानांमध्ये दोनशे रुपयांपासून मिळतो. नामांकित ब्रॅण्डचा, वॅटचा हायस्पीड पोर्ट असलेला चार्जर दोन हजारांच्या पुढे बाजारात उपलब्ध आहे. 

लॅपटॉप : टॅब, कॅमेरामध्ये काढलेले भरपूर फोटो, व्हिडिओ क्‍लिप साठविण्यासाठी तसेच अचानक एखादे कार्यालयीन काम निघाल्यास लॅपटॉप किंवा टॅबवर काम करणे सोपे जाते. या सर्व गॅजेट्‌स व्यतिरिक्त तुम्हाला एक-दोन जास्तीची मेमरी कार्ड जवळ ठेवा. एखाद्या अप्रतिम पर्यटनस्थळी सेल्फी काढण्यासाठी लागणारा स्टॅंड, स्टिकदेखील घेऊ शकता. या मुख्य 
गॅजेट्‌सबरोबर काही ऍ×क्‍सेसरीज घेतल्यास हा ट्रॅव्हल टाइम नक्कीच आनंददायी होऊ शकतो. 

ई-रीडर/मेझॉन किंडल : पर्यटनस्थळी गेल्यावर निवांत पडून वाचनाचा आनंद घेण्यासाठी तुमची आवडती पुस्तके ई-रीडर्स, ऍ×मेझॉन किंडलवर घेऊ शकता. 

ब्ल्यू टूथ स्पीकर, हेडफोन : कार ड्राइव्ह करताना किंवा प्रवासात फोन आल्यानंतर हॅण्डसेट हातात घेऊन बोलणे शक्‍य नसते. त्यामुळे ब्ल्यूटूथ हेडफोन, स्पीकर वापरणे उपयुक्त ठरते. ब्ल्यूटूथ स्पीकर दीड हजार रुपयांपासून दहा-बारा हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. यामध्येही वॉटरप्रूफ स्पीकरफोन मिळतात. गरजेनुसार त्यांची निवड करावी. 

वायफाय/पोर्टेबल नेट : स्मार्टफोन, टॅब म्हटले की, त्याबरोबर इंटरनेट, वायफायचा सर्रास वापर हा आलाच, किंबहुना ही आता गरज बनली आहे. कारमध्ये वायफाय यंत्रणा बसविणे किंवा पोर्टेबल नेट वापरणे सोयीचे असते. यासाठी बीएसएनएल, रिलायन्स यासारख्या नामांकित कंपन्यांच्या पोर्टेबल नेट सुविधा तुम्ही वापरू शकता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com