सर्वांगीण व्यक्तीमत्व घडविण्याचा ध्यास 

residentional photo
residentional photo

     गेल्या महिन्यात पुण्यात खेलो इंडियांतर्गत राष्ट्रीय स्पर्धा झाली. या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावत महाराष्ट्रांच्या संघाने सांघिक कामगिरीचे दर्शन घडवले. प्रत्येक क्रीडाप्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नोंदवलेले यश हे कौतुकास्पद आणि इतर खेळाडूंसाठी उत्साह वाढविणारे, प्रोत्साहन देणारे असेच होते,असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केंद्र-राज्य शासनाच्या क्रीडाविषयक बदलत्या धोरणाचे सर्वस्तरातून स्वागत होत असून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे एक चांगले,परिपूर्ण व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर शहराबरोबरच ग्रामीण भागात असे अनेक खेळाडू आहे, जे सुविधा आणि मार्गदर्शनाअभावी वंचित होते,अशा सर्वांना खेलो इंडियाने एकत्र आणत सर्वांगीण व्यक्तीमत्व विकास करण्याची संधीच जणू उपलब्ध करून दिली आहे. 
135 कोटींच्या देशात,स्वातंत्र्यप्राप्तीला 70 वर्ष उलटूनही अजून भारताचे मोजक्‍या खेळाडूंचा अपवाद वगळता पाहिजे त्या प्रमाणात आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधीत्व करू शकलेले नाही किंवा पाहिजे त्या प्रमाणात पदकांची लयलुटही झालेली दिसत नाही. मुंबई,महाराष्ट्राएवढे असणारे देश तेथील क्रीडाविषयक पोषक वातावरणामुळे आघाडी घेतांना दिसतात. त्या तुलनेत भारत मात्र मागे पडलेला दिसतो. खेलो इंडिया,गेल रफ्तारसारख्या व्यासपीठामुळे जे खेळाडू केवळ ग्रामीण,शहरी अथवा स्थानिक पातळीवरच खेळायचे त्यांना राज्य,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधीत्व मिळू लागले आहे. एवढेच नव्हे तर चांगली कामगिरी उंचावली तर पदकांबरोबरच रोख रक्कम( पाच लाख रूपये) तसेच नोकरीची संधी शासनाकडून उपलब्ध होऊ लागली आहे. 

   आपल्या देशात टॅलेंट जरूर आहे. या गुणवतेचा(टॅलेट) वापर योग्य ठिकाणी होणे अपेक्षित होते. हेच हेरून शासनाने खेळांडूसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.अर्थात नॅशनल युथ को ऑपरेटिव्ह सोसायटी(एनवायसीएस) सारख्या संस्थांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून या शासनाच्या उदात्त संकल्पनेला उचलून धरून यशस्वी करण्यात खारीचा वाटा उचलला आहे. हे नाकारून चालणार नाही. या अनोख्या क्रीडाविषयक उपक्रमांतील खेळाडूंच्या नेत्रदिपक कामगिरीमुळे आणि लाभलेल्या व्यासपीठामुळे भारताचे भविष्य उज्वल असल्याचे द्योतक आहे. 

गेल रफ्तारचाछोटासा प्रयत्न, बोल्ट ऍकेडमीत प्रशिक्षण 
सव्वा कोटींच्या या देशात "एनवायसीएस'ने गेल रफ्तारद्वारे स्पर्धा घेत एक छोटासा प्रयत्न केला. याच प्रयत्नाला देशपातळीवर भरभरून यश लाभले. त्यांना आम्ही एक संधी उपलब्ध करून दिली आणि अर्थातच या संधीचे निवड झालेल्या खेळाडूंनी सोनेच केले. त्यातूनच ग्रामीण आदिवासी भागातील ताई बामणे(नाशिक),निसार अहमद (दिल्ली),सुनिल कुमार(उत्तर प्रदेश) यासारख्या खेळाडूंनी देशस्तरावर आपल्या कामगिरीने नावलौकीक मिळवला. एक छोटासा प्रयत्न गेल रफ्तारच्या माध्यमातून आम्ही केला आणि त्याला इतका भरभरून प्रतिसाद लाभला की विचारता सोय नाही. सामाजिक,क्रीडा,शैक्षणिक,सांस्कृतिक यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था,मंडळे आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन असा प्रयत्न केला तर चांगले उदयोन्मुख खेळाडू पुढे येण्यास,घडविण्यास वेळ लागणार आहे. आमच्या गेल रफ्तारच्या कामगिरीच्या आधारेच जमैकाच्या नावाजलेल्या हुसेन बोल्ट ऍकेडमीत जवळपास अठरा खेळाडूंना प्रत्यक्ष राहण्याची, प्रशिक्षणाची आणि अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. जी त्यांना भविष्यात त्याचे व्यक्तिमत्व घडविण्यास निश्‍चित उपययुक्त ठरणार आहे. 

तरूणांचा देश आणि विकासाचे स्वप्न 
केंद्र-राज्य शासनाचे हे उपक्रम केवळ ठराविक उद्दिष्टापुरते मर्यादित नाही तर दिर्घकाळ चालणारी ही एक प्रक्रीया आहे. डेमोग्राफीक स्थितीतून याकडे पाहायला हवे. भारत हा जगातील तरूणांचा देश आहे. 80 कोटीपेक्षा जास्त युवाशक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळेच 2025 पर्यतचा दृरदृष्टीकोन ठेवून व्यापक काम व्हायला हवे. ही युवापिढी म्हणजे देशासाठीआपली ऍसेट आहे की लायबलिटी हे आपणच ओळखले पाहिजे. अशा युवापिढीला संधी(ऍपॉरच्युनिटी) देण्याबरोबरच त्यांना आव्हाना(चॅलेज)ची जाणीव करून द्यायला शिकवलेच पाहिजे. या युवापिढीला वेळीच एक मार्गावर आणत व्यक्तीमत्व विकास,रोजगारसाराख्या विषयांतील संधी उपलब्ध करून द्यायला हवी अन्यथा ती देशासाठी घातक,देशविरोधी कृती करणारी(डिझास्टर)ही ठरू शकते हे नाकारता येणार नाही. हाच मोठा प्रश्‍न आपल्या देशासमोर आहे. 

  इतर देशांनी तरूणाईला हेरून त्यांना देशविकासाच्या नियोजनात सहभागी करून घेतले किंबहुना त्यांचा फोकस हा तरूणाईकडेच राहिला आहे. मात्र आपल्याकडे यापूर्वी तसे न झाल्याने युवापिढी ही गुन्हेगारीकडे वळलेली दिसते. "एमपॉवर इन युथ,पॉवर इन युथ' युवाशक्ती ही मोठीच आहे तिचा योग्य वापर करून घेणे हे महत्वाचे आहे. देशातील वाढती बेरोजगारी आणि इतर प्रश्‍नांतील नैराश्‍य दूर करण्याचे सामर्थ्य या युवाशक्तीत आहे. त्यामुळे आपण आशावादी रहायलाच हवे. 
सर्व क्षेत्राचे योग्य पध्दतीने नियोजन करून कौशल्यविकासावर आधारीत संधी तरूणाईला दिली पाहिजे. एनवायसीएसच्या माध्यमातून आम्ही तेच करत आहोत. नोकरी,सरकारी नोकरी,समाज,पालक या पलिकडे जाऊन संधी आहे. फक्त ती हेरण्याची गरज आहे. सरकारी नोकरीत दोन टक्‍यांपेक्षा जास्त संधी नाही, खुल्या बाजारात अधिक संधी आहे. त्यामुळे ती लक्षात घेतली पाहिजे असे वाटते. 2025 पर्यत तरूणाई निश्‍चित जगावर राज्य करेल. यात मुळीच शंका नाही.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com