स्नेह,आपुलकीचा संदेश देणारा गुढीपाडवा

residentional photo
residentional photo

   पक्षामध्ये मोर, प्राण्यात मानव, ऋतुमध्ये वसंत ऋतु श्रेष्ठ मानतात, त्याच प्रमाणे सर्व सणात गुढीपाडवा सर्व श्रेष्ठ मानला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणार्‍या प्रतिपदेला गुढ़ीपाडवा म्हणून साजरा केला जातो. वेदा़ंग ज्योतिष्य शास्त्राप्रमाणे साडेतीन मुहूर्तामधील एक हा सण आहे.घरोघरी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. 

   महाराष्ट्रात गुढीपाडवा, कर्नाटक व आंध्रप्रदेशमध्ये युगादी, कोंकणी लोक याला संवत्सर पाडवो म्हणतात. कश्मीरमध्ये नवरेह, सिंधि लोक चेटिचंड नावाने या उत्सवाला संबोधतात. भारतातील अनेक प्रांतात नवीन वर्ष वेगवेगळ्या नावाने साजारे केले जाते. बंगालमध्ये नोबबोर्ष सुर्याचा मेष राशित प्रवेश होतो. पुथांडू तमिळनाडू 14 एप्रिल, बिहू आसाम 15 एप्रिल, विशू केरळ 13-14 एप्रिल, बैशाखी पंजाबी 13-14 एप्रिल ला मानले जाते. या दिवसाला ब्रह्माने सृष्टि निर्माण केलेला दिवस, वसुदेवाला इंद्राने वैजयंती माळ घालून सोन्याचा कळस देवून चक्राधिपती केलेला दिवस मानला जातो. शालीवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीचे सैनिक निर्माण करुन प्राण प्रतिष्ठा करुन त्याचा सहाय्याने शकांचा पराभव केला. याच नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक सुरु झाले.पुरातन काळात देवाची कल्पना केल्याऩंतर प्रथम देवी आदिमाता पार्वतीच्या रुपात पूजा सुरु झाली. पार्वती व शिवाचे लग्न पाडव्याला ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. 
    श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्या दिवशी प्रजेने गुढ्या उभारुन उत्सव साजरा केला. अशी पारंपारिक समजूत आहे. त्या दिवसापासून रामाचे नवरात्र सुरु होउन रामनवमीला संपते. या दिवशी विजय पताका म्हणून घरोघरी गुढी उभारुन त्याचे पूजन केले जाते. संत ज्ञानेश्वर,संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा या सर्वांच्या लेखनांत गुढीचे उल्लेख येतात. संत एकनाथ यांच्या अनेक काव्यात हर्षाची ,ज्ञातेपणाची, भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तिची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची,निजधर्माची रुपके सापडतात.
   सकाळी कडुलिंबाची पाने घालुन अभ्यंग स्नान करतात. कडुलिंबाच्या कोवळ्या पानाबरोबर ओवा, मीठ, हिंग, व साखर मिसळून खातात. कडुलिंब आंबट तुरट व तिखट रसाने असल्याने यांचे सेवन आर्युवेदात महत्वाचे आहे. याचा अर्थ वर्षाचा सुरुवातीला मागील सगळ्या कडु आठवणी गिळून टाकुन मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करावे. सभोवतालच्या सृष्टीचे अवलोकन केले तर शुष्क झालेली सृष्टी मोठ्याप्रमाणावर झालेली पानगळ, चैत्राचा नव पालवीने फुललेले दिसतात. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी व नंतरच्या विशिष्ट दिवशी असणारी स्थिती वार, चंद्र, नक्षत्र,सूर्याचे विविध नक्षत्रात प्रवेश, हे सर्व संवत्सर फलात येते. देशाच्या सुखसमृद्धी बद्धल माहिती संवत्सर फलात मिळते.
 पशु पक्षी जीवजंतु झाडे वेली यांच्या जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा ते परिवर्तनाच्या स्थितीतून जातात. झाडाच्या पूर्ण सुकलेल्या फांद्यातून नवीन पालवी फुटलेली दिसून येते. सर्व काही नवे दिसू लागते. उमंग ऊत्साहाची प्रकंपने वातावरणात पसरु लागतात. असा निर्सगातील हा बदल जुन्या वर्षाच्या शेवटी आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला निश्चितपणे होत असतो. बदल या सृष्टीनाटकामध्ये होतो. ब्रह्माकुमारी तत्वशास्त्राप्रमाणे परमपिता शिव परमात्माचे अवतरण ह्या सृष्टीवर झाले आहे. तो ब्रह्माद्वारे नवसृष्टीची स्थापना करीत आहे. ब्रह्माचा दिवस म्हणजे दोन युगे सतयुग त्रेता युग. ब्रह्माची रात्र म्हणजे द्वापरयुग कलियुग.आता नव युग येणार आहे. त्या निमित्ताने नव वर्षाचा दिवस मानला जातो. कडुलिंबाची पाने व गोड खाणे म्हणजे ह्या कलियुगात सुख दुखात समान राहणे. हा कलियुगाचा अंतिम काळ आहे.
   हा मानव जन्म दुर्लभ व शेवटचा आहे. त्यासाठी आपणा सर्वाना परमपिता परमात्म्याची ओळख करुन घेणे आवश्यक आहे. जीवा शिवा भेट करण्याची हिच वे आहे. आपणा सर्वाना काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकारसहित दुर्गणावर विजय प्राप्त केला पाहिजे. तेव्हाच विजय पताका मनामध्ये उडत राहिल. प्रत्येक सणामागे आध्यात्मिक रहस्य छुपलेले आहे. ते जाणुन आपण सण साजरा केला पाहिजे. प्रत्येक सणात सोहळा,समारंभ, स्वागत,सुरुचियुक्त मिष्ट्टान्न भोजन यांचा समावेश असणे आवश्यक आहे. गोडधोड खाण्याबरोबर आपले बोल मधुर असुद्या. सर्वाना प्रेम व स्नेह वाटा. आनंदाने जगा 

ब्रह्माकुमारिज मीडिया विभाग,-9483937106  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com