कारणराजकारण: भाजप नगरसेवकांचे लक्ष फक्त सोसायट्यांकडे

कारणराजकारण: भाजप नगरसेवकांचे लक्ष फक्त सोसायट्यांकडे

कोथरूडसारख्या भागात भाजप नगरसेवकांचे लक्ष फक्त सोसायट्यांकडे आहे, तर झोपडपट्ट्यांमधील समस्यांकडे साफ दूर्लक्ष आहे. ज्या भागात कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत तेथील झोपडपट्टीतील जनता त्यांच्यावर खुष असल्याचे दिसत आहे. याचा दणका भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

'सकाळ'ने कारणराजकारण या मालिकेच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड विधानसभा क्षेत्रात मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नगरसेवकांकडून दुजाभाव केला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कोथरूड हा भाग भाजप-शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सध्या युतीचे या मतदारसंघात 22 नगरसेवक आहेत. पुर्वी ही संख्या फार तर 7-8 च्या पुढे नव्हती. झोपडपट्टींपेक्षा सोसायट्यांमधून होणारे एकगठ्ठा मतदान भाजप-सेनेच्या पथ्यावर पडत असल्याचे यातून दिसते. 

लोकसभा निवडणुकीत येथील मतदारांच्या भावना जाणून घेताना केळेवाडी भागातील नागरिक तेथील नगरसेवकांवर खुष आहेत. या भागातील आमदार, खासदार काही करत नाहीत, आमच्याकडे पाणी, रस्ते, वीज, कचरा या सुविधा आहेत त्यावर नगरसेवकाचे लक्ष आहे. उलट केंद्र व राज्य सरकारच्या योजना आमच्यापर्यत येत नाहीत अशी तक्रार या नागरिकांची होती. शास्त्रीनगर भागात चारही नगरसेवक भाजपचे आहेत, पण तेथील वस्तीकडे नगरसेवकांचे दूर्लक्ष आहे. या भागातील ड्रेनेजचे चेंबर फुटले तरी ते दुरूस्त केले जात नाही, कचरा वेळेवर उचलला जात नाही. महापालिकेकडे तक्रार करूनही काहीच होत नाही. आम्हाला आमच्या खिशातून पैसे खर्च करून कामे करून घ्यावी लागतात असा असे नागरिक सांगत आहेत.

पुर्वीचे नगरसेवक वस्तीमध्ये फिरत असत. लागेल त्याला मदत करत, कामे करत, पाणी व्यवस्थित येत होते, कचरा वेळेवर उचलत पण आता कोणी इकडे फिरकत नाहीत. केवळ या नगरसेवकांचे लक्ष सोसायट्यांकडे आहे, असा आरोप मतदारांनी संतप्त भावनेने व्यक्त केला. "सकाळ'ने लोकसभेचा कानोसा घेताना तेथील नागरिकांचा केंद्र सरकारसह स्थानिक नगरसेवकांवर प्रचंड रोश असल्याचे दिसून आले. कोथरूडमधील सामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झाला असल्याने याचा फटका मतपेटीतून भाजपला बसण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com