आम्ही मदतीला घाबरतो!

मृणाल वानखेडे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

प्रे फॉर कोल्हापूर, प्रे फॉर सांगली असे स्टेटस फोनवर दिसत होते. त्या लोकांसाठी प्रार्थना करणारे ते स्टेटस होते ज्यांच अस्तित्व ज्यांच आयुष्य पणाला लागलं होतं.

टीव्ही वर कोल्हापूरची पूरस्तिथी पाहिली, लोकांचे मृतदेह पहिले, अश्रू अनावर होताना पहिले, कळकळ पहिली. माझेही अश्रू अनावर झाले. भीती वाटली, खूप भिती वाटली, निसर्गाचं भयानक रूप अंगावर आलं. चारही बाजूला पाणी बघून अंगावर शहारा आला. जीव कासावीस झाला आणि स्वतःच्या असहाय्यतेची दया आली. 

प्रश्न पडायला लागले, फोनचे नोटिफिकेशन वेगवेगळे फोटो, व्हिडिओ माझ्यासमोर आणू लागले. चित्रपटात पाहिलेले व्हीएफएक्स नेहमी चर्चेचा भाग असायचे. सत्यात अस पहिल्यांदा घडतांना पाहत होते. संसार उध्वस्त होताना पाहात होते. ना स्त्री दिसत होती ना पुरुष ना जात ना धर्म ना रंग ना रूप सगळ्यावर पाणी होत. पण अश्रू दिसत होते, रडण्याचा आवाज ऐकू येत होता, देवाला केलेल्या प्रार्थना ऐकू येत होत्या. श्वासांची दौड जाणवत होती, हृदयाचे वाढलेले ठोके कानावर पडत होते, भावनांचा उद्रेक जाणवत होता आणि भावनांमध्ये येणारा कोरडेपणाही दिसत होता, गरज दिसत होती, असासूसलेपणा पुन्हा जाणवत होता. किंचाळी ऐकू येत होती, कुटुंबाची काळजी बोचत होती, दिसत होती आपल्या लोकांना शोधणारी नजर आणि ती प्रत्येक हाक पुण्यातही ऐकू येत होती. 

प्रे फॉर कोल्हापूर, प्रे फॉर सांगली असे स्टेटस फोनवर दिसत होते. त्या लोकांसाठी प्रार्थना करणारे ते स्टेटस होते ज्यांच अस्तित्व ज्यांच आयुष्य पणाला लागल होत. नाही वाचावेसे वाटले ते स्टेटस. कारण प्रार्थना मनात चालूच होती. मदत करावी वाटली, जावा वाटलं तिथे आणि परत मला माझ्या असहायतेची दया अली. 

मग झाले चालु आव्हानं, मदतीची पैश्यांची मदत, अन्न, पाण्याची मदत. संकेतस्थळ, फोन नंबर, पत्ते, अकाउंट नंबर सगळं येऊ लागला अगदी एका क्लीक वर. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सगळे आपल्या सोशिअल मीडियाचा वापर करू लागले. पाणी ओसरतच नाहीए. मी हे सगळं पहिल्यांदाच अनुभवत्ये. टीव्ही वरून का होईना. 
सर्वत्र पाणी आणि आपल्या आयुष्याचा प्रश्न मनी. स्वतःच्या आयुष्याची किंमत कळाली एका क्षणात. भीती वाटली स्वतःसाठीही, कारण आपण खूप स्वार्थी असतो. मदत करावीशी वाटते पण आपण लगेच ती करत नाही. का? त्याचीही भिती नाटते की काय आपल्याला? काय विचार करतो आपण? आपली नड ही कोणाच्या आयुष्यापेक्षा मोठी असते का? असे काय कामात असतो आपण कि त्या पुढे काही गावांच उध्वस्त होणं शुल्लक होता आपल्यासाठी. आपण मुद्दाम नाही करत हे, पण मग आपण का करतो? वॉट्सअँप वर मेसेज आला कि त्याक्षणी पाहणारे आपण त्या क्षणी फोन हातात घेऊन का नाही मदत करत? का आपल्या आजूबाजूला आता इतक्या घटना घडू लागल्या आहेत कि आपल्याला माणसांच्या आयुष्याची किंमत उरली नाहीये?

उत्तर शोधल पाहिजे ना. आपणच आजच कदाचित आत्ताच. कारण आव्हान करणारे खूप आहेत मग मदत करणारे हि खूप हवेत ना. आपल्या अडचणींमध्ये, आपल्या सुखी आयुष्यामध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या नात्यांमध्ये, आपल्या समारंभांमध्ये आजच्या कोल्हापूर आणि सांगलीच्या परिस्थितीला थोडीशी तरी जागा मिळेलच ना. जी झळ आपल्या शरीराला, आपल्या आत्म्याला, आपल्या माणसांना, आपल्या गावाला नाही बसली त्याची किंमत तरी असावी ना आपल्याला? 
जिथे सगळं पाण्याखाली गेल तिथे माणुसकीने जन्म घ्यायला हवा.

इतर ब्लॉग्स