Pune Rains : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच पूर

सारंग यादवाडकर, पर्यावरण कार्यकर्ते
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पुण्यातील पूरस्थिती ही प्रशासकीय हलगर्जी आहे. ज्याला ओढा म्हंटला जातो ती एक नदी आहे.मात्र नदीचा दर्जाच त्याला कधी दिला गेला नाही.त्यामुळे त्याची पूररेषा निश्‍चित झालेली नाही.त्यातून ही स्थिती उदभवली आहे.

पुण्यातील पूरस्थिती ही नैसर्गिकपेक्षा प्रशासकीय हलगर्जीपणा आहे. अंबिलओढा परिसरातील स्थितीचा विचार केला, तर या ओढ्याला ओढा म्हणताच येणार नाही. ती एक नदीच आहे. त्याची वहनक्षमता ही २२ हजार क्‍युसेक आहे. आपण तिला कधी नदीचा दर्जा दिला नाही. त्यामुळे त्याची पूररेषा निश्‍चित झालेली नाही. त्याला ओढा समजूनच बांधकामे झाली. 

नाल्याचा वापर कचरा, प्लॅस्टिक टाकण्यासाठी केला जाऊ लागला. त्यामुळे हा प्रवाह संकुचित झाला. पाण्याच्या निचऱ्यासाठी पुरेशी व्यवस्था झालेली नाही. या प्रवाहमार्गाकडे इतर ठिकाणाहून पाणी येण्याचा वेग वाढलेला आहे. परंतु त्याला नाल्याचे रूप आल्याने वहनक्षमता कमी झालेली आहे. त्यातून ही स्थिती उद्‌भवली आहे. 

पावसाचे प्रमाण ३५.७ टक्‍क्‍यांनी वाढणार हा अहवाल ‘टेरी’ ने दिलेला आहे. परंतु तो कुणालाही ज्ञात करून दिलेला नाही. त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. कमी काळात जास्त पाऊस पडणार, असे अहवाल सांगतो. त्याकडे दुर्लक्ष ही प्रशासनाची सर्वांत मोठी चूक आहे. प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांचा बेदरकारपणाच अशा घटनांना कारणीभूत आहे. 

आता या नाल्यांना पुन्हा नदीचे रूप प्राप्त करून दिले पाहिजे. कारण टेकड्यांवर अतिक्रमणे झाली आहेत, तेथील झाडे तोडून अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामुळे तेथे पाणी जिरत नाही. ते वेगाने अशा नाल्यामध्ये येते. त्यांची वहनक्षमता कमी झाल्याने अशा दुर्दैवी घटना घडतात. या नाल्यांना पुन्हा नद्या करीत नाही, तोपर्यंत यातून सुटका नाही.

इतर ब्लॉग्स