Pune Rains : काँक्रिटीकरणाचे दुष्परिणाम

प्रदीप रावळ, प्राध्यापक, सीओईपी
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ते जमिनीत मुरणे गरजेचे असते. मात्र, पुण्यात पाणीच जिरत नाही. कारण, सर्वत्र सिमेंटची बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी साचते. सांडपाण्याच्या नैसर्गिक व्यवस्थेत अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे नाले छोटे झाले असून, पाणी वाहून जाण्यासाठी जागाच मिळत नाही. मग ते पाणी रस्ता आणि सोसायट्यांमध्ये वाट मिळेल तिकडे पसरते.

नैसर्गिक बदलांमुळे पावसाचे प्रमाण वाढणारच आहे. त्याचे पाणी साचू द्यायचे नसेल तर हार्ड सरफेस म्हणजे काँक्रिटीकरण कमी करावे लागणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये अतिपाऊस लक्षात घेऊन काही ठिकाणी ५०० एमएमच्या ड्रेनेजलाइन टाकण्यात आल्या आहेत. मात्र, अशा परिस्थितीत या लाइनदेखील कमी पडत आहेत. कारण, त्यात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे त्या जाम झाल्या आहेत. त्यांची देखभालदेखील योग्य प्रकारे घेतली जात नाही. 

शहरातील अनेक भागांत नाल्यांचा नदीकडे जाण्याचा प्रवाह अडविण्यात आला आहे. काही ठिकाणी हे प्रवाह वळविण्यात आले आहेत. त्यामुळे दरवर्षी अशीच परिस्थिती होत राहणार. हे सर्व टाळण्यासाठी ‘अर्बन ड्रेनेज स्पेशालिस्ट’ नेमून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले पाहिजे. ब्रिटनमध्येदेखील असे प्रकार होत होते. मात्र, त्यांनी वेळीच उपाययोजना केल्या. महामार्गावरील पाणी एका ठिकाणी आणून ते जिरवले जाते. त्यामुळे पाण्याचा पातळी समतोल राहिली आहे.

पुण्याचा आकार हा बशीसारखा आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी पाऊस झाला तर त्याचे पाणी नदीला जाणे अपेक्षित आहे. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण झाले आहे. या बांधकामावर निर्बंध हवे. पाणी मुरले तर भूजलाची पातळीदेखील वाढेल. त्यासाठी बांधकाम नियमावलीमध्ये बदल करण्याची गरज आहे.

यामुळे तुंबले शहर 
पाणी जिरण्यासाठी नाही जागा
काँक्रिटीकरण वाढले 
नाल्यांचे प्रवाह अडविले व बदलले
बांधकाम करताना आपत्तींचा विचार नाही
ड्रेनेजलाइनची देखभाल नाही

इतर ब्लॉग्स