Happy Birthday Lata Mangeshkar : 'दीदी और मैं'

रोहिणी पांडे
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

'दीदी और मैं' या पुस्तकात मीनाताईंनी साऱ्या देशाचं भूषण असलेल्या लतादीदींच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा संपूर्ण आलेख आपल्या शैलीत मांडला आहे. यामध्ये काही आठवणी, कुटुंबासोबतचे खास क्षण आणि मंगेशकर कुटुंबाची काही दुर्मिळ आणि गतकाळातील छायाचित्र पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.

भारताची गानसम्राज्ञी, भारतीय संगीतात ज्यांना प्रत्यक्ष सरस्वतीचा गानस्पर्श झालेला आहे, प्रत्येक भारतीयाच्या मनात सूर होऊन राज्य करणाऱ्या, महाराष्ट्रास अत्युच्च कलेचा वारसा प्रदान करणाऱ्या महाराष्ट्रकन्या लता मंगेशकर यांचा २९ सप्टेंबर हा जन्मदिन.

मंगेशकर कुटुंब म्हणजे जणू महाराष्ट्राचे गौरवभूषणच. मीना मंगेशकर यांचं आत्मवृत्त मागच्या वर्षी प्रकाशित झालं नि आता याच पुस्तकाचा हिंदी अनुवाद दीदींच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत प्रकाशित होणार आहे. खुद्द दीदींच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'दीदी और मै' असं नामाभिधान मिळालेल्या या हिंदी पुस्तकासाठी प्रस्तावना लिहली आहे, खुद्द 'बिग बी द अमिताभ बच्चन' यांनी. त्यामुळे सोने पे सुहागा असा हा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे.

'दीदी और मैं' या पुस्तकात मीनाताईंनी साऱ्या देशाचं भूषण असलेल्या लतादीदींच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा संपूर्ण आलेख आपल्या शैलीत मांडला आहे. यामध्ये काही आठवणी, कुटुंबासोबतचे खास क्षण आणि मंगेशकर कुटुंबाची काही दुर्मिळ आणि गतकाळातील छायाचित्र पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. दीदींच्या ९०व्या वाढदिवसाच्याच निमित्ताने 'दीदी और मैं' प्रकाशित होत असल्याचा आनंदही मीना मंगेशकर यांनी व्यक्त केला.

महानायक अमिताभ बच्चन यांनी 'दीदी और मै' या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. त्यामुळे पहिल्या पानापासूनच पुस्तक हे खिळवून ठेवणारं ठरेल, असं स्पष्ट होत आहे. सुप्रसिध्द पत्रकार आणि ज्येष्ठ साहित्यिक अंबरीश मिश्र यांनी मूळ मराठी पुस्तकाचा हिंदी अनुवाद केला आहे. आता सर्वच भारतीयांसाठी दीदींच्या प्रेरणादायी जीवनाचे हे पुस्तकरुप प्रेरक ठरेल, यात शंकाच नाही.

इतर ब्लॉग्स