Vidhan Sabha 2019 : शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपात उभी फूट

सचिन बडे
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

शेवगाव व पाथर्डी तालुक्‍यातील भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारी "निर्धार मेळावा' घेत विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना उघड विरोध केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात भाजपमध्ये उभी फूट पडली आहे. परिणामी, आमदार राजळे यांची मोठी अडचण झाली असून या मेळाव्यात त्यांच्या तिकिटास विरोध करण्यात आला. दोन्ही तालुक्‍यात पक्षात पडलेली ही उभी फूट पक्षश्रेष्ठी कशी रोखतेय याकडे लक्ष लागले आहे.

पुणे ः शेवगाव व पाथर्डी तालुक्‍यातील भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारी "निर्धार मेळावा' घेत विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना उघड विरोध केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात भाजपमध्ये उभी फूट पडली आहे. परिणामी, आमदार राजळे यांची मोठी अडचण झाली असून या मेळाव्यात त्यांच्या तिकिटास विरोध करण्यात आला. दोन्ही तालुक्‍यात पक्षात पडलेली ही उभी फूट पक्षश्रेष्ठी कशी रोखतेय याकडे लक्ष लागले आहे.

विद्यमान आमदार राजळे गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवत आमदार झाल्या होत्या. मात्र मागील गेल्या काही काळामध्ये त्यांच्याकडून निष्ठावान कार्यकर्त्यांना वेळोवेळी डावलण्यात येऊन त्यांना हीन वागणूक दिल्याचे बोलले जात होते. याबाबत स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठी आणि ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडेही तक्रार केली होती. या कार्यकर्त्यांनी राजळे यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, असा आग्रह धरलेला आहे. मात्र, उघड विरोध अद्याप झालेला नव्हता. परंतु, सोमवारी शेवगाव येथे झालेल्या मेळाव्यात शेवगाव आणि पाथर्डी तालुक्‍यातील भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, शहराध्यक्ष आदी उपस्थित होते. तसेच भाजपकडून विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या हर्षदा काकडे, दिलीप लांडे आणि अमोल गर्जे यांच्यासह मोहन पालवे, दिनकर पालवे, अमोल गर्जे, संजय बडे, बाळासाहेब सोनावणे, संभाजी पालवे, राहुल कारखेले, अविनाश मगरे, किसन आव्हाड, अशोक गर्जे, महेंद्र शिरसाट, संजय आंधळे आदी मेळाव्यास उपस्थित होते.

विद्यमान आमदार राजळे या काही मोजक्‍या कार्यकर्त्यांसह एकट्या पडल्याचे चिन्ह दोन्ही तालुक्‍यात निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तरीही त्यांचा विजय अशक्‍य असल्याचे बोलले जात आहे. परंतु, निष्ठावान म्हणून "निर्धार मेळावा' घेणाऱ्यांमध्ये एक पेक्षा जास्त इच्छुक असल्याने अडचण झाली आहे. मात्र, मागील काही दिवसापासून दोन्ही तालुक्‍यातील भाजपमधील अंतर्गत वातावरण पूर्ण ढवळून निघाले आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपश्रेष्ठी आणि पंकजा मुंडे काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर ब्लॉग्स