बाय सेक्शुअल नात्यावर भाष्य करणारा 'काय बाय'

चंद्रशेखर शितोळे
बुधवार, 8 जानेवारी 2020

17 जानेवारीला काय बाय हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. 

काय बाय

गे-बाय सेक्शुअल विषयावर मी - चंद्रशेखर शितोळे "काय बाय" हा मराठी चित्रपट तयार केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळालाय आहे. 17 जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. 

चित्रपटाचे कथानक ऑस्ट्रेलिया स्थित एका मराठी कुटुंबापासून होते. अपघाताने पतीचे एका गे मुलाशी शारीरिक संबंध येतात. डोळ्यासमोर घडलेली ही घटना पेशाने डॉक्टर असलेली पत्नी पचवू शकत नाही. ती तिच्या वडिलांना बोलावून घेते व घटस्फोटाचा निर्णय सांगते. तिचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तिचे वडील त्यांच्या भूतकाळातील अशी काही गोष्ट सांगतात की, जी सर्वांना स्तब्ध करून टाकते. मेलबर्न मध्ये नाटक, शॉर्ट फिल्म करताना मला चित्रपटाची कथा सुचली. लगेच चित्रीकरणास सुरवात केली. बऱ्याचशा वाईट-गोड  अनुभवातून हा चित्रपट पूर्ण झाला आहे. याबद्दलची एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कथानकाच्या गरजेनुसार मला एका दृश्यासाठी एका गे  मुलासोबत  शारीरिक  संबंध  ठेवायचे  होते. हा सिन खूप महत्वाचा असल्याने तो रिअल वाटावा म्हणून संपूर्ण नग्न दृश्य घेणे गरजेचे होते. पुरूषाचा संपूर्ण नग्न सिन कदाचित मराठीसाठी नवीनच असावा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चित्रपटातील हेच दृश्य दिग्दर्शकाच्या रीळ आणि रिअल लाईफ मध्ये ही मोठे वादळ घेऊन आले. मी या सिनची माहिती माझ्या पत्नीला  दिली  होती,  परंतु  तो सिन  इतका बोल्ड  आणि  संपूर्ण नग्न असेल याची कल्पना दिली नव्हती. शेवटी मला पत्नीला समुपदेशाकडे घेऊन जावे लागले. त्यामुळे हा सिनेमा त्यांच्यासाठी खूप मोठ्या आठवणी देऊन गेला. यामध्ये  आशय  कुलकर्णी,  सुनील गोडबोले,  भाग्यश्री देसाई,  शीतल पाटील  यांसारखे  नावाजलेले  तसेच  ऑस्ट्रेलियातील वसुंधरा कटारे, अमेय साने, प्रांजली कर्वे, अमृत पटेल यासारखे नवखे तरीही अनुभवी कलाकार आहेत.

संगीत आणि पार्श्वसंगीत या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. संत एकनाथ महाराजांच्या "देव एका पायाने लंगडा" या गवळणीला संगीतकार - गायक श्रीकृष्ण चंद्रात्रेय यांनी खूप सुंदर साज चढवला आहे. सत्यजित रानडे यांनी चित्रपटाचा ऑस्ट्रेलियातील आणि भारतातील भाग देशी-विदेशी ट्रॅकने खूप सुंदर पद्धतीने रंगवला आहे.

तर असा हा वेगळ्या विषयावरचा वेगळ्या पद्धतीने मांडलेला चित्रपट आपण जरूर पाहावा अशी माझी अपेक्षा आहे. 17 जानेवारीला संपूर्ण महाराष्टात "काय बाय". 

https://www.youtube.com/watch?v=51ohCwrw_Q8

kay bi marathi movie traile

इतर ब्लॉग्स