पोलिओ हद्दपार तरीही अभियान का?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

आरोग्य संपन्न देश ही प्रगतशील देशाची नांदी असते. भारत देशात जास्तीत जास्त बालमृत्यू हे संसर्गजन्य आजारामुळे होतात. त्यापैकीच अतिसंसर्गजन्य परंतु लसीकरणाद्वारे 99.9 टक्के आटोक्‍यात येण्याजोगा पोलओ हा आजार आपल्या देशातून हद्दपार म्हणजे irradicate झालेला आहे. 
भारताचा शेवटचा wild polio ची लागण झालेला रुग्ण 13 जानेवारी 2011 ला वेस्ट बेंगालच्या हावडा जिल्ह्यात आढळला. महाराष्ट्रात शेवटच्या पाच केसेस बीड आणि मालेगाव जिल्ह्यात 2010 साली आढळल्या. 
 

पोलिओत अग्रेसर होता भारत 

एकेकाळी पोलिओचे जास्तीत जास्त रुग्ण असणारा भारत हा जगाच्या पाठीवरचा दुसरा देश होता. 1988 मध्ये 3.5 लाख पोलिओचे रुग्ण भारतात होते आणि 2019 मध्ये फक्त 33 पोलिओचे रुग्ण आपल्या देशात उरले होते. थोडक्‍यात लक्षात घ्यावयाचं की, पोलिओ विरोधीच्या EPI म्हणजे Expanded Program of Immunisation या जागतिक लसीकरण संघटनेच्या प्रभावी लसीकरणामुळे पोलिआ हा विषाणू आता भारतात नाही आणि हे पोलिओमुक्त भारत असण्याचं यश फक्त तुमच्या आमच्या सारख्या सुजाण नागरिकांनी लसीकरणावर दाखविलेल्या विश्‍वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच आहे. 
 
पोलिओ मुक्तीची घोषणा 
भारताने आजवर राबविलेल्या राष्ट्रीय पोलिओ अभियानाचे खूप मोठं यश आहे. 27 मार्च 2014 रोज WHO या जागतिक आरोग्य संघटनेने भारत आणि साउथ इस्ट आशिया हे देश पोलिओ मुक्त म्हणून जाहीर केलेले आहेत. परंतु प्रत्येक देश हा दळणवळणासाठी इतर देशांशी जोडलेला असतो. अतिसंसर्गजन्य असलेला हा पोलिओचा विषाणू कुठल्याही मार्गाने पुन्हा आपल्या देशात प्रवेश करू कारण आपल्या शेजारील पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नायजेरिया हे देश पोलिओमुक्त नाहीत. येत्या वर्षभरात म्यानमार, चायना, पाकिस्तान, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादी देशात मिळून 312, VDPV म्हणजे Vaccine derived polio virus सापडले आहेत. 
 

पुन्हा पोलिओ नको म्हणून 
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशात अनुक्रमे 10 आणि 61 रुग्ण 2019 सालांमध्ये आढळले. 
या देशांमधून पोलिओचे संक्रमण आपल्या देशात पुन्हा होवू नये. यासाठी येत्या 19 जानेवारी 2020 रोजी पल्स पोलिओ अभियान पुन्हा जगभर राबविण्यात येत आहे. संपूर्ण देशातील शुन्य ते 5 वर्षाखालील प्रत्येक बालकास जरी ते नुकतेच जन्मले असले तरी, जरी त्याने पूर्वी पोलिओचे डोस घेतले असतील तरी आणि किरकोळ सर्दी तापाने मुल आजारी असेल तरीही. हे पोलिओचे 2 थेंब त्यांना पाजण्यात यावेत ही विनंती. 

शंभर टक्के हवाय पाठींबा 
पोलिओ अभियानाला सर्व सुजान नागरिकांनी 100 टक्के पाठिंबा द्यावा अशी कळकळीची विनंती सर्वच आरोग्य संघटना करीत आहेत. या अभियानात WHO युनिसेफ, आय. एम.ए. आय.ए.पी सारख्या आरोग्य संघटना, रोटरी क्‍लब, अंगणवाड्या, शैक्षणिक संस्था आणि इतरही अनेक सरकारी यंत्रणा आपली मोलाची कामगिरी बजावत आहेत. वेळ आली आहे, मात्र प्रत्येक सुजाण पालकाची बाळाला पोलिओ पाजण्याची. 19 जानेवारी 2020 ला अनेक ठिकाणी पोलिओ बुथ घोषीत आहेत. 
आपल्या जवळच्या बुथवर जावून आपल्या पाल्याला पोलिओ थेंब पाजालेच पाहिजेत. 
 
फिरते पोलिओ बुथ 
देशातील एकही मुल या पोलिओ ड्रॉप पासून वंचित राहू नये यासाठी फिरते बुथही कार्यरत असणार आहेत. यामध्ये रेल्वेस्टेशन, गार्डन, मॉल्स, सरकारी दवाखाने, झोपडपट्टी वसाहत, बांधकामाच्या ठिकाणी असणारी मुले, वीटभट्ट्या, उसतोडीसाठी आलेली कुटुंब, उड्डाणपुलाखालील मुलं इत्यादी प्रत्येक 5 वर्षांखालील बालकाला ही लस देण्याचा आरोग्य संघटनेचा व्यापक प्रयत्न आहे. या अभियानासोबतच 18 वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाचा लसीकरणाचा तक्ता पूर्ण असण्याची खात्री पालकांनी भरून घ्यावी. भविष्यात उद्‌भवणाऱ्या प्राणघातक आजारांपासून आपल्या मुलाला वाचविण्यासाठी लसीकरणाचं कवच कुंडल अत्यावश्‍यक आहे. हे समजून घेवून प्रत्येक मुलाला सरकारी आणि ऐच्छिक लसी देवून घ्याव्यात. 

(लेखििका या बालरोगतज्ज्ञ  तथा आयएमए औरंगाबादच्या उपाध्यक्ष आहेत) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com