स्टायलिश समर कोट 

स्टायलिश समर कोट 
स्टायलिश समर कोट 

ओव्हरकोट आणि उन्हाळ्यात आर्श्‍चयचकित झालात ना? होय. खरंय! कडक उन्हापासून आपल्या त्वचेच्या संरक्षणासाठी आणि एक फॅशन म्हणून हे समरकोट बाजारात येत आहेत. नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनरने समर स्पेशल ओव्हरकोट्‌सचे कलेक्‍शन सादर केले. 

- उन्हाळ्यात डोक्‍याला रुमाल, सनकोट्‌स, जॅकेट्‌स वापरण्याऐवजी स्टायलिश ओव्हरकोट हा पर्याय कसा वाटतो? फॉर्मल्समध्ये तुम्हाला ब्लेझर किंवा स्टायलिश जॅकेट्‌स घालायला आवडत असतील तर समर कोट्‌सदेखील नक्की ट्राय करा. 

- अभिनेत्री आलिया भट आणि सोनाली बेंद्रे या दोघी समरकोट्‌समध्ये दिसल्या. ओव्हरकोट्‌स हे आता हिवाळ्यापुरते उन्हाळ्यातही तुम्ही सहज वापरू शकता. 

- लाइट कलरचे कॅज्युअल कॉटन किंवा इतर प्रकारच्या कापडांचे समरकोट तुमच्य पेहरावानुसार निवडा. 

- तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असा कोट फॉर्मल पॅंट, क्रॉप टॉप्स, पलाझो, लॉंग स्कर्ट, डेनिम यावरही उठून दिसतो. 

- हे कोट्‌स शक्‍यतो कॉटन फॅब्रिकमध्ये असतात. या समरकोट्‌सवर बोहो स्टाइलची ज्वेलरी भारी दिसते. 

- या समरमध्ये उन्हापासून संरक्षण करण्यासाठी, तसेच वेगळी स्टाइल म्हणून हे समर ओव्हरकोट्‌स नक्की ट्राय करा.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com