ट्रम्प पर्वाची सुरवात

Donald Trump visits Saudi Arabia
Donald Trump visits Saudi Arabia

अमेरिकन अर्थव्यवस्थेला शस्त्र निर्यातीशिवाय दुसरा कोणताही सक्षम पर्याय नाही हे अमेरिकेला चांगलच माहित आहे. त्यामुळे ट्रम्प त्याला अपवाद असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी पहिल्याच द्विपक्षीय भेटीत सौदीशी ११० बिलीयन डाॅलरचा शस्त्र खरेदी करार घडवून आणून दणक्यात सुरवात केली आहे म्हटल तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ट्रम्प यांनी "बाय अमेरिकन हायर अमेरिकन"चा नारा अगोदरच दिला आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती त्यांची प्राथमिकता आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुक प्रचारादरम्यान इस्लामिक दहशतवाद तसेच मुस्लीमांविरुद्ध अत्यंत विखारी भाषणे देत व त्यांना अमेरिका बंदीच्या वल्गना करत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक पटलावर चांगलीच राळ उडवून दिली होती. जगभरातील पुरोगामी लोकांच्या नाकावर टिच्चून हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्याच निर्णयामध्ये त्यांनी सात मुस्लीम राष्ट्रांना अमेरिकेत प्रवेशबंदी करत जास्तच आगीत तेल ओतले होते. पण हे सर्व करत असताना सौदी अरेबियाशी असलेले आर्थिक व सामरिक संबंध दुखावणार नाहीत याची काळजी अत्यंत चाणाक्ष व्यावसायिक असलेल्या ट्रम्प यांनी घेतली होती. ट्रम्प यांचे वैयक्तिक व्यवसायही जगभरातील २४ देशांमध्ये विस्तारले आहेत. त्यामध्ये सौदीचाही समावेश आहे.
 
आपल्या पहिल्या विदेशवारीची सुरवात ट्रम्प यांनी मध्य पुर्वेतून करतानाच सौदी अरेबियाची प्रथम निवड केली. या दौरयामध्ये सौदीचे राजे सलमान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. त्याचबरोबर जीसीसी देशांच्या व अरब-इस्लामी अमेरिकी परिषदेमध्ये सहभाग घेतला. सौदी अरेबियाचे संरक्षणमंत्री महमंद बिन सलमान यांनी ट्रम्प यांचा दौरा होण्याअगोदर अमेरिकेचा दौरा केला होता. ट्रम्प यांची भूमिका मुस्लीमांविरुद्ध नसल्याचे सांगत ट्रम्प यांच्यासाठी पायघड्या घालत असल्याचे स्पष्ट सुतोवाच त्यांनी केले होते. त्याचबरोबर मुस्लीम राष्ट्रांची बंदी योग्य ठरवली होती.
 
ट्रम्प यांनी विखारी भाषेला मृदू भाषेत परिवर्तन करत इस्लामसह सौदीचे जोरदार गोडवे गाताना तब्बल ४०० बिलियन अमेरिकन डाॅलरचे द्विपक्षीय करार घडवून आणले... ही रक्कम आॅस्ट्रीया देशाच्या जीडीपीच्या दुप्पट आहे. ११० बिलीयन डाॅलरच्या बदल्यात सौदी निवळ अमेरिकेकडून शस्त्रे खरेदी करणार आहे. उभय देशांदरम्यान शस्त्रखरेदीचा करार होत असताना पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ सुद्धा उपस्थित होते. निवृत्तीनंतर शरीफ यांनी सौदीच्या नेतृत्वाखालील इस्लामिक मिलीटरी आघाडीचे नेतृत्व स्वीकारले आहे.

आयसिसचा मुकाबला करण्यासाठी तसेच इराणचा वाढता दबाव यामुळे सौदीने हे पाऊल उचलले आहे. सौदीच्या नेतृत्वाखाली येमेनमध्ये गेल्या दोन वर्षापासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत १० हजार लोकांनी जीव गमावला आहे. या द्विपक्षीय करारांमुळे सौदीला सुरक्षा कवच तर अमेरिकेला रोजगार निर्मितीमधून फायदा नक्की होणार आहे. 
ट्रम्प यांनी "बाय अमेरिकन हायर अमेरिकन"चा नारा अगोदरच दिला आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती त्यांची प्राथमिकता आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेला शस्त्र निर्यातीशिवाय दुसरा कोणताही सक्षम पर्याय नाही हे अमेरिकेला चांगलच माहित आहे. त्यामुळे ट्रम्प त्याला अपवाद असण्याची सुतराम शक्यता नाही.
  
गेल्या तीन वर्षापासून आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या तेलांच्या किंमतींमुळे सौदीनेही तेलाच्या बाजारपेठेवर अवलंबित्व कमी करण्यासाठी व्हिजन राबविण्यास सुरवात केली आहे. त्या धोरणांनुसार बिझीनेस फ्रेंडली वातावरण तसेच नोकरशाहीला अधिक कार्यप्रवण केली आहे. त्याचबरोबर स्थानिकांना प्रथम प्राधान्य आदी मुद्यांचा समावेश आहे.
 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात इराणशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करताना इराणवरील आर्थिक बंदी उठवली होती. त्याच दरम्यान सौदीशी दोन हात राखून होते. सौदी व इराणमधील वर्चस्वाची लढाई चांगलीच पेटली आहे. पण ट्रम्प यांनी आपल्या परराष्ट्र धोरणात बदल करताना सौदीला चुचकारण्याचा प्रयत्न करताना इराणला खडे बोल सुनावले आहेत. ट्रम्प प्रशासनाने प्रवेशबंदी केलेल्या देशांमध्ये इराणचाही समावेश आहे. त्यामुळे सौदी सुखावला असेल यात काही शंका नाही.

पण इस्लामिक राष्ट्रांना दहशतवादाच्या मुद्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले. दहशतवादाला प्रत्येक देशाने आपापल्या भूमीतून हद्दपार करणे गरजेचे आहे, कट्टरतवादालाही लगाम गरजेचा असलेल्या ट्रम्प यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com