यांच्या मागासलेपणाला काय म्हणायच....

Divorce Couple
Divorce Couple

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर इस्लाममधील सर्वांत वादग्रस्त ठरलेल्या तीन तलाक पद्धतीला देशातून मोडीत काढण्यात आली आहे. जगातील बहुतांश इस्लामिक देशांमधून तीन तलाक सारख्या अनिष्ट प्रथेला केव्हाच हद्दपार करण्यात आलं आहे. पण भारतात ही प्रथा अजूनही अस्तित्वात होती. तीन तलाक पद्धतीमध्ये तत्काळ व एकतर्फी तलाक दिला जाऊन संबंधित स्त्रीला बरयाच मरणयातना सहन कराव्या लागत होत्या. तीन तलाकला बंदी घालण्यात आली असली तरी एक ते दोन महिन्यात नियमित तलाक पद्धतीने मुस्लीमांना तलाक देता येऊ शकतो. त्या पद्धती एहसान व हसन नावाने परिचित आहेत. 

इस्लाम धर्मामध्ये तीन तलाक जसा वादग्रस्त विषय आहे तसाच बहुपत्नीत्व सु्द्धा तितकाच चर्चेचा व वादाचा विषय आहे. इस्लाममध्ये पुरुषांना चार विवाह करण्याची मुभा असली तरी त्यासाठी नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत व समान न्याय व संपत्तीच्या वाट्यात कोणताही भेदभाव न करणे हा त्यामधील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. याच विषयाला अनुसरून सौदीमध्ये जगातील सर्वांत मोठं महिला विद्यापीठ असणारया प्रिन्सेस नोरा विद्यापीठामध्ये गेल्यावर्षी मार्च महिन्यात बहुपत्नीत्व संदर्भांत पोल घेण्यात आला होता. या पोलच्या माध्यमातून विद्यापीठातील मुलींना विविध प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये विवाहित पुरुषांसोबत लग्न करण्याला तुम्ही प्राधान्य द्याल का असाही प्रश्न विचारण्यात आला होता.आश्चर्यकारकपणे ६१ टक्के मुलींनी या प्रश्नाला होकारार्थी उत्तर दिले होते व ३० टक्के मुलींनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. तर ९ टक्के मुलींनी या विषयावर काहीच मत नाही असे सांगत तटस्थ राहिल्या होत्या. त्यावेळी सोशल मिडियातून या पोलची बरीच चर्चा झाली. या चर्चेमध्ये सौदीमधील लेखक, शैक्षणिक क्षेत्रातील मातब्बर, कायदेतज्ज्ञ आदींनी आपापली मते नोंदवली होती. काहींनी बहुपत्नीत्वाला समर्थन दिले, तर काहींनी अशा प्रकारच्या चर्चा करण्यावरच सडकून टीका केली. टीका करणारयांमध्ये विद्यापीठातील साहित्यातील प्राध्यापकांचाही समावेश होता.  

आपल्या देशामध्ये मुस्लिम समुदायातून तलाक व बहुपत्नीत्व यावर बरेच चर्वितचर्वण होत असतानाच जगाच्या पाठीवर असे पण काही देश अस्तित्वात आहेत जिथं घटस्फोट प्रक्रियेला अवैध ठरविण्यात आलं आहे. यामध्ये फिलीपिन्स व जगभरातील ख्रिश्चन लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या व जगातील सर्वांत लहान देश असलेल्या व्हॅटिकन सिटी या देशांचा समावेश आहे. सन २०११ मध्ये मालटा देशामध्ये घटस्फोटाला दीर्घ लढ्यानंतर कायदेशीर मान्यता देण्यात आली. घटस्फोटाला कायदेशीर मान्यता देण्यात आली असली तरी अटी व नियमही घालून देण्यात आले आहेत. जगभरात घटस्फोट कायदेशीर करण्यात आला आहे. फिलीपिन्स व मालटा दोन्ही देश कॅथलिक चर्चला संलग्न व धार्मिक भावनांनी जोडले गेले आहेत. कॅथलिक चर्च घटस्फोटाच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यांना विवाह हा जन्मभरची कटिबद्धता वाटते. मालटामध्ये घटस्फोटाला मान्यता मिळाली असली तरी जोपर्यंत विभक्त होऊन चार वर्ष पूर्ण होत नाहीत तोपर्यंत घटस्फोटासाठी त्या जोडीला पात्र समजले जात नाही. अमेरिकेमध्ये जेवढ्या सहजतेने घटस्फोट घेता येतो तेवढ्या सहजतने जगामध्ये कुठच घटस्फोट दिला जाऊ शकत नाही. किरकोळ कारणावरूनही अमेरिकेमध्ये घटस्फोट दिल्याचे प्रकरणे समोर आली आहेत.  

फिलीपिन्समध्ये आजही घटस्फोटाला मान्यता नाही. पण कायदेशीरपणे विभक्त होऊन संबंधित जोडीला संपत्तीची विभागणी करता येते. मात्र त्यांना पुर्नविवाह करता येत नाही. विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांना अन्नुलमेंट (annulment) मिळू शकते. पण त्यासाठी मानसिक असमर्थ किंवा समलैंगिक असेल किंवा आणखी कोणते कारण असेल तर तस सिद्ध करावे लागते व त्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागलात. त्याचबरोबर सारा खटाटोप परवडण्याच्या पलीकडे आहे. फिलीपिनो नागरिकाने परदेशात जाऊन घटस्फोट घेतला तरी मायदेशात परतल्यानंतर त्याला ग्राह्य मानला जात नाही किंबहुना तो गुन्हा समजला जातो. फिलीपिन्समध्ये केवळ विशिष्ट परिस्थितीमध्ये मुस्लीमांना घटस्फोटाची परवानगी आहे. 

जगातील सर्वांत लहान देश असलेल्या व्हॅटीकन सिटीमध्येही घटस्फोटाला मान्यता देत नाही. विवाह हा कायम स्वरूपासाठी असतो यावर कॅथलिक चर्चचे मत कायम आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया व्हॅटीकन सिटीमध्ये अस्तित्वात नाही. केवळ अन्नुलमेंट हा पर्याय आहे. चिली देशांमध्येही २००५ साली काही अटींवर घटस्फोटाला मान्यता देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com