

DJ Culture
esakal
नागरिकांनो, अश्लील गाण्यांवर नाचण्यासाठीच काही नतध्रष्ट लोकांना डीजे पाहिजे आहे. या लोकांना कितीही समजून सांगितलं आवाजाची मर्यादा कमी करा तरी ते करत नाहीत, वरकरणी बोलतात आणि प्रत्यक्षात डीजेवर अश्लील गाणी लावून खुला कामवासनेचा बाजार मांडतात. आता तरी नागरिकांनो घराबाहेर पडा आणि डीजे बंद पाडा असंच म्हणण्याची वेळ आलेली आहे.
पुण्यात काही सजग नागरिकांनी डीजे बंद करण्यासाठी मोर्चे काढले आंदोलन केली. पुन्हा पुन्हा काही सजग नागरिक रस्त्यावर उतरून डीजे विरोधात आंदोलन करत आहेत मोर्चे काढत आहेत. सोशल मीडियावरदेखील प्रचंड प्रमाणात डीजेचा विरोध आणि ढोल-ताशांच्या अतिरेकी वादनाचाही विरोध होत आहे.