घर नाही तरीही शांततेची झोप.... 

old man live on foothpath
old man live on foothpath

मी दादरहून आमदार निवासाला जात होते. तेव्हा एक बाबा रस्त्यावरच झोपताना दिसले. मला विचार आला, की बाबा इथेच राहतात की फक्त त्यांचे दुकान आहे? काय करू? त्यांची झोप मोडू की नको? 
पण योगायोगाने बाबा उठले. मग मी बाबांजवळ गेले आणि त्यांना विचारले, बाबा तुम्ही इथेच राहतात का? तर ते म्हणाले, हो, हे माझे घर आहे. मी विचारात पडले. मला हिंमत होत नव्हती त्या बाबांना त्यांच्या फॅमिलीबद्दल चौकशी करायची. पण तरीही मी हिंमत करुन एकदाचे विचारले, की बाबा तुम्हाला फॅमिली नाही का? तेव्हा ते बाबाच स्वत:ला बोलले की बाळा कोणी कोणाचे नाही गं या जगात. मी पुन्हा विचारत पडले. मग हिंमत करून बाबांना विचारले, की बाबा असे का बोललात तुम्ही? इथे रक्ताची नाती नाही पण तरी जीवाला जीव देणारी माणसं आहे हो. असे म्हणताच बाबांनी वेळ न लावता लगेच उत्तर दिले बाळा मी तितका नशीबवान नाही. असे का बोलत आहात तुम्ही? तेव्हा ते बाबा बोलायला लागले. की त्यांना 3 मुले आणि 2 मुली आहेत. एकूण 5 जण आहेत. हे ऐकून मला वाईट वाटले. त्यांना विचारले की बाबा ते सर्व कोठे असतात? ते म्हणाले, माझ्या बायकोच्या घरी.. मला काहीच समजले नाही. मी काही विचारणार त्याआधीच बाबा बोलले, की माझी बायको वारली आणि 9 दिवसानंतर मला माझ्या मुलांनी घरातून काढून टाकले. माझ्या डोळ्यात पाणी आले. बाबा...मी हळू आवाजात बोलले की बाबा असे कसे करू शकतात हे लोक? 


तेव्हा बाबा सांगायला लागले, की बाळा मी आणि माझी बायको आम्ही आमच्या गावला साताऱ्याला मस्त आनंदात राहत होतो. पण मुलांसाठी 1966 मध्ये ते मुंबईला आले. त्यांनी दोघांनी मिळून काम करून मुंबई दादरमध्ये 84 साली घर घेतले. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. मुलं मोठी झाली. त्याच घरात मोठ्या मुलीचे लग्न झाले आणि त्यानंतर एकामागेएक मुलांची लग्न झाली. त्यांना नातू आले. पण 2017 डिसेंबरमध्ये त्यांची बायको हे जग सोडून गेली. त्यानंतर बाबा या जगात असून, नसल्यासारखे जगत होते. काही दिवसांनी बाबा आजारी पडले आणि त्यांना कोणीच रुग्णालयात घेऊन गेले नाही. बाबा सांगून-सांगून थकले. ते हे सर्व सांगत असताना माझ्या अंगावर मात्र काटे येत होते. अरे...इतकी पण वाईट माणसं असतात का, की ज्यांच्यामध्ये आपण राहत आहोत? मग त्या बाबांच्या बाजूलाच त्यांचा एक मित्र राहत होता. त्यांनी त्या बाबांना रुग्णालयात नेले आणि त्यांना तेथे अॅडमिट केले. बाबांवर उपचार चालू झाले. पण पुढे जे बाबांनी सांगितले, ते तर ऐकून माझे कान बंद पडले. डॉक्टरांनी बाबांना कॅन्सर झाला असल्याचे सांगितले. हे ऐकून त्यांचा मित्रही हैराण झाला. हिंमत करून त्याने बाबांना कॅन्सर झाल्याची माहिती दिली. मित्राने त्यांना खूप हिंमत दिली आणि त्यांना त्या धक्क्यातून बाहेर काढायचा प्रयत्न केला. त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून 3 दिवस झाले होते. तरीही त्यांच्या मुलांपैकी कोणीही त्यांना बघायला आले नाही.

बाबा हॉस्पिटलमधून बाहेर निघून आले तसे परत घरी गेले नाहीत. तेथून ते सरळ दादरला निघून आले. काही दिवस सिद्धिविनायक गणपतीच्या बाहेर राहिले. नंतर त्यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या पैश्यातून काही चपला विकत घेतल्या. फुटपाथवर एक वडाच्या झाडाखाली जागा बघितली आणि एक छोटे दुकान लावले. मागील चार महिन्यांपासून ते तिथे राहत आहेत. खूप वाईट वाटते आज सर्व नातेवाईक असून, पण कोणी नसल्यासारखेच आहेत. मी त्या बाबांना बोलले, की मी तुम्हाला आश्रमात घेऊन जाऊ का? काही मदत करू का? ते म्हणाले नको बाळा, मी इथेच राहून काम करेन आणि खाईन. मला जेव्हा वाटेल तेव्हा नक्की मी तुला सांगेल. ठीक आहे, म्हणून मी त्यांना माझा नंबर दिला. पण मित्रांनो, हे कितपत योग्य आहे हो....? आपणही एक दिवस त्या बाबांच्या जागी येणार आहात. आपणही यातून जाणार आहोत ना...? हे विसरू नका मित्रांनो आज वृद्धाश्रमाची जास्त गरज का भासते? मी त्या बाबांच्या फोनची वाट बघते आहे. मी त्यांना वृद्धाश्रमात घेऊन जाणार. त्यांना आधार देणार. पण तुमचे काय, हो मित्रांनो..?  आजच विचार करा.. आपण कुठं कमी पडत आहोत..? आपण आपल्या पोटाला चिमटा काढून, एक वेळ उपाशी राहून आपल्या मुला-मुलींना शिकवतो.. ते याचसाठी का? वृद्धापकाळात त्यांनी आपल्याला घराबाहेर काढायला का...? आपण मुलांवर चांगले संस्कार करायला कुठेतरी कमी तर पडत नाही ना...? पुढे जाऊन मुलेही आई-वडीलांना घराबाहेर काढण्यासाठीच मोठी होतात का? 
अजूनही वेळ गेलेली नाही...आजच विचार करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com