सावधान! आता पिकांना धुक्याचे आव्हान!

residentional photo
residentional photo

     पाऊस आणि ढगाळ वातावरणा बरोबरच आता महाराष्ट्रातील पिकांना धुक्याचा सामना करावा लागणार आहे.  धुक्यामुळे दरवर्षी महाराष्ट्रात 700 टनांपेक्षा अधिक निर्यातक्षम द्राक्षांचे सौदे रद्द होऊन नुकसान होते. पंजाब मधील शेतकरी दरवर्षी धुक्यामुळे शेकडो टन बटाटा खराब झाल्याने रस्तावर ओतून देतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून धुक्याचा ‘अलर्ट’ देणार्या यंत्रणेची सातत्याने मागणी भारतीय शेतकरी करीत आला आहे पण हवामान खाते याबाबत अलर्ट देण्यास असमर्थत आहे.

धुके म्हणजे काय ?

धुके म्हणजे पाणी आणि बर्फाचे अत्यंत सुक्ष्म कणांचे तरंगते थर होय. धुके म्हणजे  जमिनी लगत तरंगते ढगच होय. व्हीजिबिलीटी (VIZIBILITY) म्हणजे ‘द्दष्यता’ कमी करण्यास धुके कारणीभूत ठरते. ‘किमान एक किलोमीटर वरील द्दष्य न पाहता येण्यासारखी स्थिती म्हणजे धुके’ आहे अशी शास्त्रिय भाषेत धुक्याची व्याख्या करता येते. दाट धुक्यात 50 मीटर अंतरावरील द्दश्य ही पाहणे कठीण होते.

धुक्यापासून धान्याचे रक्षण आवश्यक त्यासाठी पुढील उपाय करावेत. 

- धुके असतांना आणि धुके निवळतांना दवबिंदूच्या रूपात जमा होणारे पाणी अन्न-धान्य व पिकांच्या नासाडीस कारणीभूत ठरते. डाळींब, द्राक्ष आदी पिकांसाठी तसेच कांदा आणि बटाट्यासाठी देखील धुके एक नंबरचा शत्रू ठरते. धुक्याने द्राक्षाचे मणी देखील तडकतात. भाजीपाला धुक्याने लवकर सडतो. पिकांवर बुरशीचे अनेक प्रकार धुक्यामुळे उद्भवतात. करपा, तांबेरा, डाऊनी, भूरीचा प्रादुर्भाव, पांढर्या माशी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव धुक्याने वाढतो. धुक्यापासून धान्याचे रक्षण आवश्यक आहे, त्यासाठी काही ‘वेदर मॉडिफिकेशन’ तंत्रोउपाय करता येणे शक्य आहे.

- धुके असतांना धान्याच्या कोठाराचे, शेताचे तापमान वाढविण्यासाठी ‘हॅलोजन बल्ब’ सारखे उष्णता देणारे बल्ब लावण्याची व्यवस्था उपयोगी ठरू शकते.

- शेताच्या कडेला, मोकळ्या जागी शेकोटी पेटविणे ही धुके कमी करण्यास उपयोगी ठरू शकते.
मात्र हे उपाय करत असतांना पिकांना आग लागणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे.

- द्राक्षाचे मणी किंवा फळभाज्या धुक्याने खराब होऊ नये म्हणून बाष्प टिपणारे टिपकागद वापरता येणे शक्य आहे. वृत्तपत्राच्या कागदाचा उपयोग देखील आच्छादनासाठी टिपकागदा सारखा करता येवू शकतो.
धुक्यापासून रक्षणासाठी मोठे मेनकापड अथवा ताडपत्रीचा वापर करून धान्य झाकणे शक्य आहे. मात्र धान्याला अळई अथवा किड लागू नये या करीता धुके निवळताच असे आच्छादन दूर करून वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com