हा युतीचा पराभवच

shivsena-bjp
shivsena-bjp

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युतीला बहूमत मिळाले असले तरीही ते युतीसाठी निराशाजनक आहेत. जनतेने जो निर्णय दिला आहे तो धक्कादायक असला तरी, अगदीच अनपेक्षित नव्हता हे उघड आहे. युतीच्या या परिस्थिती ला काही "खास" कारणे आहेत आणि ती सुर्यप्रकाशाएवढी स्वच्छ आहेत.

ही खास कारणे पुढील प्रमाणे आहेत. १) गेली पाच वर्षे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आपल्याच युती सरकारवर केलेली घणाघाती टीका आणि सरकारची केलेली बदनामी २) सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने निर्माण केलेला सवतासुभा आणि नेत्यांचा अहंमन्यपणा ३) महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील संधिसाधूंना पक्षात दिलेला प्रवेश ४) पक्षातील जुन्या निष्ठावंतांना डावलून या दलबदलूंना दिलेली उमेदवारी  ५) ज्या कट्टर विरोधी पक्ष नेत्यांना भाजपने भ्रष्ट म्हणून सदैव लक्ष केले, त्याच नेत्यांना भाजपने सांगितले म्हणून स्वच्छ मानले(च) पाहिजे अशी केलेली अपेक्षा ६) महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अतिआत्मविश्वासाने अनेकदा केलेली दर्पोक्ती. ७) शिवसेना भाजपमध्ये अपरिहार्य तडजोड म्हणून झालेली युती आणि ८) जनतेला सदैव ग्रुहित धरण्याची व्रुत्ती !!

आता उद्धव ठाकरेंनी परिपक्वता दाखवून, पाच वर्षे, विनाअट, दबावतंत्र न वापरता, समजूतदारपणा दाखवून, सरकार चालवायची तयारी दाखवली तरच भाजपने शिवसेनेच्या साथीने सरकार स्थापन करावे. अन्यथा सरकार स्थापन करून, हात दाखवून अवलक्षण आणि ये रे माझ्या मागल्या असे करू नये. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com