पोटाची खळगी भरण्यासाठी आटापिटा!

sturggle for Food.jpg
sturggle for Food.jpg

कॉलेजहून रोजच्याप्रमाणेच बसने घरी येत होते. खिडकीच्या बाजूला जागा मिळाल्याने बाहेर पाहात दिवसभर काय केले याचा विचारचक्र सुरु होते. तेवढ्यात, मन हेलावून टाकणारे चित्र बाहेर दिसले. विचारचक्र तिथेच थांबलं मन सुन्न झाले अन् डोळे पाणावले. पोटाची खळगी भरवण्यासाठी एक वृध्द व्यक्ती कचराकुंडीत खरकटे अन्न शोधत होते. 

बस सुरु झाली..ते दृश्य मागे पडले. पुन्हा सुरु झाली विचारांची शृंखला. असे किती लोक असतील जे किमान एक वेळचं खायला मिळावं म्हणून जीवाचा आटापिटा करत असतील? अनेक उपाय शोधत असतील? किंवा किती लोक काहीच नाही मिळाले म्हणून पोटाजवळ घुडघे घेऊन रात्रभर स्वतःची समजूत घालत असतील? एवढ्या मोठ्या भारत देशात ही उपासमारीची भयावह परिस्थिती निर्माण व्हावी, यासारखे दुर्दैव दुसरे कोणते असेल! जागतिक स्तरावर सर्वाधिक उपासमारी असणाऱ्या देशांपैकी एक असणारा आपला 'महान' देश. 

अनेक हॉटेलांमध्ये रोज कितीतरी उरलेले फेकून देतात. ताटात अन्न शिल्लक राहतं तेही फेकून दिले जाते. एकीकडे एखादा तरी अन्नाचा कण पोटात जावा म्हणून धडपडणारे जीव आणि दुसरीकडे ही अन्नाची नासाडी. हे हॉटेलांमध्ये उरलेले अन्न या भुकेल्यांपर्यंत कसे पोहचवता येईल? आपल्या कामातून रोज थोडा वेळ काढता येईल का?  आपणच  हे सुरु केले तर? पण कुठून सुरु करू? माझ्या प्रयत्नांना यश मिळेल का? असे एक नाही अनेक प्रश्न फिरत होती. पण, विषय खरंच खूप गंभीर आहे. सर्वांनी यावर विचार करणे गरजेचे आहे. 

कमीत कमी आपण अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी तर घेऊ शकतो. भुक असेल तेवढेच अन्न ताटात घ्यावं.  उरलेल अन्न फेकून देण्यापेक्षा भुकेलेल्या अन्न द्यावे. खुप काही नाही पण एवढं केल तरी किती मोलाची मदत होईल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com