गणपती मंडळांची भेट ठीक आहे पण CM शिंदे पुण्यात आढावा बैठका कधी घेणार?

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sakal
Updated on

मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? मला तर नायक मधला अनिल कपूर आठवतो. रस्त्याने वेगाने धावणारा मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा, खडबडून जागे झालेले अधिकारी, कर्मचारी वर्ग, पोलीस आयुक्तांपासून महापालिका आयुक्त अगदी तलाठ्यापर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याची उडालेली तारांबाळ, आढावा बैठका, माध्यमांशी संवाद वगैरे वगैरे वगैरे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा मात्र अगदी आध्यात्मिक असणार आहे. मी असं का म्हणतेय? हे या लेखातून तुम्हाला कळेलच.

CM Eknath Shinde
दोन महिन्यातच CM शिंदेंना वैतागले अधिकारी; प्रोटोकॉल न पाळल्याने नाराजी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात आहेत. या मंडळाला भेट, त्या मंडळाला भेट असा हा त्यांचा गणेश दर्शन दौरा आहे. आजच्या पुणे गणेश दर्शन दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे तब्बल बारा छोट्या मोठ्या गणपती मंडळांना भेटी देणार आहेत. मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपतीच्या दर्शनाने या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. तर नाना पाटेकरांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाने या दौऱ्याचा शेवट होणार आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून तीन ते चार वेळाच ते पुण्यात आले. त्यातही त्यांनी एकदाच पुण्यातल्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. विकासकामं आणि समस्यांबद्दल चर्चा तर लांबचीच गोष्ट.

CM Eknath Shinde
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देणं टाळलं!

आता तुम्ही म्हणाल, चांदणी चौकातल्या ट्रॅफिकबद्दल नायक स्टाईले शिंदेंनी निर्णय घेतलाच की. अहो, पण तो निर्णयही त्यांनी का घेतला? कारण तिथल्या ट्रॅफिकचा फटका स्वतःलाच बसला. आता मुख्यमंत्री स्वतःच वाहतूक कोंडीत अडकलाय म्हटल्यावर नाचक्की होणार, प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आणि अल्टीमेटली त्यांनाच जाब विचारला जाणार. तेव्हा आता डॅमेज कन्ट्रोलसाठी काहीतरी करणं त्यांना भाग होतंच. त्यामुळे तो निर्णय घेऊ झाला. पण त्यांचे इतर सगळे दौरे गाठीभेटी दौरेच झालेत.

मुख्यमंत्री शिंदेंच्या या दौऱ्यांना आता अधिकारीही कंटाळलेत. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदी आल्यापासून त्यांनी कोणताही प्रोटोकॉल पाळलेला नाही, अशी अधिकाऱ्यांची तक्रार आहे. शिंदेंच्या नियोजित दौऱ्याची कोणतीही माहिती मिळत नाही. तसंच नियोजित दौऱ्यात अनेकदा परस्पर फेरफार केली जाते. या बदलाची माहिती पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनाही नसते. त्यामुळे सुरक्षेसाठी असलेल्या आणि तैनात असलेल्या पोलिसांनाही ताटकळत उभं राहावं लागतं. शिवाय, दिलेल्या वेळेत मुख्यमंत्री शिंदे पोहोचत नाही. रात्री उशिरा बैठका, दौरे घेतात. त्यामुळे तो सगळा वेळ अधिकाऱ्यांना काम करत बसावं लागतं. राज्यातलं राजकारण सध्या तापलेलं असल्याने मुख्यमंत्री शिंदेंना कडक सुरक्षा व्यवस्था आहे. पण त्यांच्या सततच्या बदलत्या दिनक्रमामुळे अधिकारी वर्ग आता त्रासला आहे.

यंदा सगळ्याच सणांना राजकीय रंग लागलाय. मग गणपती बाप्पाही त्यापासून कसा वाचू शकेल? कोणी आपली खुर्ची तर कोणी आपला पक्ष वाचवण्यासाठी गणपती बाप्पाच्या चरणी साकडं घालतंय. शिंदेंच्या अस्तित्वाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. या लढाईत निकाल आपल्याच बाजूने लागावा, यासाठी ठिकठिकाणच्या गणपती बाप्पांना साकडं घालण्यासाठीच तर मुख्यमंत्री शिंदे गणेश दर्शन दौरे करत नाहीयेत ना?

आता गणपतीनेच त्यांना जरा जनतेच्या प्रश्नांकडेही लक्ष द्यायची सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना जनता करू लागलीय. तुमचे कोणते प्रश्न आहेत, जे मुख्यमंत्र्यांनी ऐकावेत, असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. गणपतीबाप्पाचं दर्शन झालं, की मुख्यमंत्री त्याकडेही लक्ष देतील, अशी अपेक्षा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com