Blog : डोनाल्ड ट्रम्प झाले ‘डोनाल्ड डक’

Donald Trump faces a major political setback following the Democratic Party's victory in the US midterm elections.

Donald Trump faces a major political setback following the Democratic Party's victory in the US midterm elections.

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : अमेरिकेत नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाची धुळधाण उडाली. डेमॉक्रटिक पक्षाला अमेरिकेचे प्रतिनिधी सभागृह (काँग्रेस) व सिनेट (ज्येष्ठ सभागृह) या दोन्ही सदनात बहुमत मिळाले. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘डोनाल्ड (लेम -शक्तिहीन) डक’ झाले. डिज्नी ‘निर्मित मिकी माऊस’ या प्रसिद्ध कार्टून सेरीजमध्ये डोनाल्ड डक च्या अनेक करामती पाहावायास मिळतात. तशा करामती ते आजवर करीत होते. परंतु, खर्या अर्थाने ते शक्तिहीन डक (बदक) झाले आहेत.

डेमॉक्रॅटिक पक्षाच्या विजयाचे ‘ब्लू त्सुनामी’ असे वर्णन केले जाते. अमेरिकेच्या राजकारणाला त्यामुळे अयतिहासिक कलाटणी मिळाली. तिचे परिणाम व पडसाद केवळ अमेरिका नव्हे, तर जगात सर्वत्र उमटत आहेत.

Loading content, please wait...