
प्रिय विराट,
अजूनही काय रिऍक्ट करू माहित नाही, दिवसभरात तूझ्याबद्दल बातम्यांमध्ये ऐकताना, वाचताना, तू रिटायर झालाय हे सतत जाणवत होतं, वाईट वाटत होतं, पण रिऍक्ट करता येत नव्हतं. पण सगळं संपून शांत झालं आणि दिवसभरात रोखलेले अश्रु आपोआप डोळ्यात तरळले.
खरंतर तर जेव्हा तुझी पोस्ट पडली ना, तेव्हा फक्त इतकंच वाटलं की का?? आत्ता कशासाठी, काय गरज होती??? तू कसोटी पाहण्याचं मोटिवेशन होतास. तुझ्यातलं क्रिकेट अजून संपलेलं नाही, हे कोणीही मान्य करेल (जरी तुझी सरासरी खाली गेली असली तरी). तू बेस्ट होतास, तू बेस्ट आहेस आणि आता नेहमीच राहशील.