Blog : कॅन्व्हासवर उमटतात चित्रकाराच्या मनातील भावना !

कॅन्व्हासवर उमटतात चित्रकाराच्या मनातील भावना !
कॅन्व्हासवर उमटतात चित्रकाराच्या मनातील भावना !
कॅन्व्हासवर उमटतात चित्रकाराच्या मनातील भावना !Canva
Summary

चित्रकाराच्या मनात आलं की तो ते चित्र कॅन्व्हासवर उतरवतो. वेळ आली की पॅशन म्हणजेच कलेबद्दलचे प्रेम, कलेसाठीचा उतावळेपणा रंगांद्वारे समोर उतरवू लागतो.

सांज वेळ होती ती... चहाचा गरम वाफांनीयुक्त आस्वाद घेत असताना सहजच मनात आलेले आकाशातील ते रंग आणि खिडकीतून हलका पाऊस (Rain) येत होता व हिरवीगार झालेली झाडे मनातील कलाकाराला जागृत करत होती... त्याच वेळी समोर कॅन्व्हास (Canvas) धरला आणि रंग (Colors) उचलू लागलो. कॅन्व्हासवर रंग आणि आकार हळूहळू भरत होता. चित्रकाराच्या (Painter) मनात आलं की तो ते चित्र (Drawing) कॅन्व्हासवर उतरवतो. वेळ आली की पॅशन (Passion) म्हणजेच कलेबद्दलचे प्रेम, कलेसाठीचा उतावळेपणा रंगांद्वारे समोर उतरवू लागतो. कवीची कविता, लेखकाचा लेख, कलाकाराची कला तसेच चित्रकाराचे चित्र मनातले बोलून जातात; अगदी मनाचा आरसा असल्याप्रमाणे हे सर्व कलागुण उमगत जातात आणि ते प्रेमाने बहरत जातात. काही कलाकारांना उमगलेले शब्द, चित्रे व लेखही वास्तवात उतरत जातात आणि त्यातून मिळणारा आनंद सर्व त्रासाला, दु:खाला, वेदनेला आणि नाराजीवर घाव घालत, एक आत्मा तृप्त होणारे समाधान देतो.

कॅन्व्हासवर उमटतात चित्रकाराच्या मनातील भावना !
Blog: एका तालिबानीचं नरेंद्र दाभोलकरांना पत्र...

काही चित्रकार अभ्यासू असतात. नवनवीन प्रयोग करण्यास त्यांना आवडते. असे म्हणतात, की काही कलाकार आपली शैली तयार करतात आणि ती सर्व जगात प्रसिद्ध होते. लोक कोट्यवधी रुपये देऊन ती विकत घेतात. कलेला किंमत खूप आहे. आज पैशाला किंमत आहे पण त्याहून जास्त किंमत कलेला आहे. मन जिंकण्याचे सामर्थ्य या कलागुणांत आहे. आता हे चित्रकार आपले आकार चित्रात दाखवतो, त्यातून रंग चढतात आणि त्यात एक प्रेम असणारी खूप सुंदर कलाकृती निर्माण होते. अनेक कलाकार मी पाहिले आहेत. मी मागे म्हटल्याप्रमाणे कला वेदनेतून उमगते आणि त्यातून बहरते, हे वाक्‍य अनेक कलाप्रेमी, कलाकार, चित्रकार, लेखक व कवी यांना तंतोतंत बसते. हे मी पाहिले आहे आणि त्यातून अनुभवले आहे. त्यांच्या आयुष्यात दुःखद घटना घडल्या तर त्यातून सावरत दुनियेला आपल्या चित्रातून, कलेतून प्रेरणा देत आहेत. खूप चित्रकार आपल्या मनातील दुःख व त्रास विसरून रंगांच्या दुनियेत जातात. रंग आणि त्यात ताळमेळ घालताना अनेक सुंदर अशा कलाकृतीची चित्रे तयार होतात. मनाला आणि आत्म्याला भिडणारी ही चित्र खूप बोलकी असतात.

कॅन्व्हासवर उमटतात चित्रकाराच्या मनातील भावना !
Blog: नरेंद्र दाभोलकर यांचे तालिबानीच्या 'त्या' पत्राला प्रत्युत्तर

काही लोकांना अमूर्त शैली कळत नाही, असे ऐकण्यात येते; परंतु भारतीय संस्कृती आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीमध्ये फरक आहे. भारतीय आणि पाश्‍चात्त्य देशात वाचन व लेखन संस्कृतीत फरक आहे. पाश्‍चात्त्य देशात जे समजते, जो बोध कलेतून मिळतो त्याचे लेखन केले जाते आणि त्याचे वाचनही केले जाते. परंतु आपल्या प्रांतात लेखन आणि वाचनाला प्राधान्य फक्त शालेय शिक्षणापुरतेच आहे. एखाद्या चित्रातून काय समजले हे लेखन करणे आणि त्यातून वाचन होणे हे गरजेचे आहे. त्यामुळे अमूर्त शैली मला कळत नाही, हा स्वर सहज ऐकू येतो; पण त्यात अनेक रहस्य, रंग, ताल व एखादी विशिष्ट शैली लपलेली असते. ती उमगणे गरजेचे आहे. प्रत्येक चित्रामध्ये विशेषत: असते. अगदी एखादी रेघसुद्धा महत्त्वाची ठरते. प्रत्येक रंगाला स्वभाव आहे. त्या स्वभावाचे जाणकार खूप असतात. त्यातून निर्माण होणारी कला खूप काही सांगून जाते. प्रत्येक रंग त्याचा स्वभाव चित्राच्या स्वरूपात उतरवत असतो, प्रत्येक रंग काही तरी सांगून जातो. तसेच निसर्गापासून शिकण्याचेही प्रयत्न होतात. निसर्गासाठी रंगसंगती चित्रकाराला प्रेरणा देते. रंगांची उधळण करत असताना जो आनंद मिळतो तो काही औरच आहे, हे त्या चित्रकारापेक्षा जास्त कोणाला कळणार! रंगांची उधळण होत असताना आत्म्यातील विविध भावना या चित्रातून त्यात असतात. जणू हे चित्र मनाचा आरसाच आहे. अनेक अशा कलाकृती निर्माण होतात ज्या जग जिंकण्याचे सामर्थ्य ठेवतात. आजच्या धगधगीच्या जीवनामध्ये कलागुण जगण्यास प्रेरणा देत आहेत. त्यातच रंगांची उधळण ही सुंदर असे जग निर्माण करेल. चित्रकाराच्या चित्रांना खरंच सलाम करावा वाटतो. कारण, त्यात त्या चित्रकाराचे रंग, भावना, प्रेम आणि त्या चित्रातील खोली ही त्या चित्रकाराला प्रेरणा देते. सुंदर कलाकृती मनाला भेदण्याचे काम करते आणि हे चित्रकार व कलाप्रेमींशिवाय कुणालाही कळू शकत नाही, असे एकंदरीत वाटते.

- ऋत्विज चव्हाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com