
India Pakistan Tension
Sakal
India Pakistan Tension : युद्धाच्या रणभूमीवर जशी तोफांची गोळाफेक होते, तसे शुक्रवारी 3 ऑक्टोबर रोजी भारतातकडून पाकिस्तानवर इशाऱ्यांची गोळाफेक झाली.
त्या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी हैद्राबादहून वक्तव्य केले, की देशवासीयांच्या सुरक्षेसाठी कोणतीही सीमा ओलांडू. ते म्हणाले, की 2016 चा सर्जिकल स्ट्राइक, 2019 मधील बालाकोट हवाई हल्ले व अलीकडील ऑपरेशन सिंदूर द्वारे भारत सरकारने हे दाखवून दिले आहे, की भारताची अखंडता जपण्यासाठी देश गरज पडल्यास सीमा ओलांडू शकतो. सर क्रीकचा उल्लेख करीत त्यांनी सांगितले, की तो रस्ता कराचीकडे जातो, हे पाकिस्तानने ध्यानात ठेवावे.