
आज माय मराठीच्या उत्सवाचा खास दिवस आहे. मराठी भाषा दिनानिमित्त राज्यभरात, राज्याबाहेर अन् विदेशातही मराठी जनांकडून माय मराठीचा गौरव केला जात आहे. असाच मराठीचा गौरव करणारं कर्नाटक राज्यातील 'मराठी प्रतिष्ठान बंगळुरु' नावाचं एक मंडळ आहे. बंगळुरु शहरात स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी एकत्र येत या मंडळाची स्थापना केली आणि विविध मराठी संस्कृतीचे, साहित्याचे आणि शिक्षणाचे उपक्रम राबवले. या मंडळाची यशोगाथा आपण या विशेष ब्लॉग म्हणून जाणून घेणार आहोत.