नवी दिल्ली : प्रस्तुत ब्लॉग लिहित असताना सर्व वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेल्या ठळक बातमीने देशाचे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना युद्धकळात होणारे सराव सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, 'ब्लॅकआउट्स करणे (संपूर्ण काळोख), सायरन्स (नागरिकांना हल्ल्याची पूर्वसूचना देणारे भोंगे), जनतेला सुरक्षिवात स्थळी नेण्याचे सराव’ आदी करण्यास सांगितले आहे.