New Year Celebration : नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

देशभरात साजरा होणारा हा सोहळा जेवढा मनातून आनंद देणारा असतो तेवढाच नेत्रदीपकही असतो.
New Year Celebration : नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

Happy New Year 2023 : आज जवळजवळ प्रत्येकच घरातले दिवे मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. त्यामुळे देश रात्रीसुध्दा जागा होता असं म्हणायला हरकत नाही. कारण आज सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं गेलं. हा सोहळा जेवढा नेत्रदीपक आहे तेवढाच मनाला सुखावणारा आणि नवउमीद देणारा ठरला.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडचे हॉटेल्स, क्लब, पब एवढेच नाही तर अगदी शेत, वावरं सुध्दा तरुणाईच्या रंगांनी उजळून निघाले होते. जागोजागी रोषणाई, फटाके आणि हॅप्पी न्यू इयरच्या शुभेच्छा यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारलेला अनुभवायला मिळाला.

शहरातल्या मुख्य रस्त्यांवर तर जणू जत्राच भरलेली होती. डिसेंबर महिन्याच्या गुलाबी थंडीच्या मध्यरात्रीही लोक आईस्क्रीम खाण्याचा आनंद लुटत होते. जिथे चारचाकी, दुचाकींची वर्दळीने रस्ते भरलेले असतात, तिथे आज पायी चालणंही कठीण होतं असं दृश्य होतं. या नववर्षात सर्वांना मनापासून भरभरून शुभेच्छा देताना, आनंद व्यक्त करताना लोक दिसत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com