मरावे परी ‘देह’ रुपी उरावे...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Organ Donation

मरावे परी ‘देह’ रुपी उरावे...!

शिवाजी भोसले , उपसंपादक

‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’ या संत वचनाप्रमाणे 'मरावे परी देहरुपी उरावे' उक्ती अनेकांनी आचरणात आणल्याने सोलापुरातील देहदान चळवळीला सन २०१० पासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'मेडिकल हब' म्हणून नावारूपाला आलेले सोलापूर देहदान चळवळीत महाराष्ट्रात सर्वात आघाडीवर आहे. मेडिकल कॉलेजसाठी लागणारा एक मानवी देह मिळायला जिथे १५ वर्षे गेली, त्याच सोलापूरात आता येथील मेडिकल कॉलेजेस यांना वर्षभर लागणाऱ्या बॉडीज सोडून आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यात मानवी देह पाठवले जात आहेत. या मानवी देहांच्या अभ्यासावर तज्ञ भावी डाॅक्टर्स रुग्णसेवेत येत आहेत.शिवाय खरोखरच्या गरजूंना दान स्वरुपात अवयव मिळत असल्याने त्यांना पुन्हा आपले आयुष्य पुन्हा जगता येत आहे, मिळालेल्या दृष्टीतून हे श सुंदर जग पहाता येत आहे.

येथील देहदान चळवळीने आता चांगलेच 'बाळसे' धरले आहे. वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे सोलापूरचे नाव सातासमुद्रपार पोहोचले, आता देहदान चळवळीने सोलापूरचे नाव जगाच्या नकाशावर आले आहे. सोलापूर शहर जिल्हा वासियांसाठी ही भूषणावह गोष्ट आहे.

- चंदूभाई देढिया

देहांगगदान जीवनदान समाजसेवी संस्था, सोलापूर.

देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था या अंतर्गत सोलापुरातील देहदान चळवळीशी मी जोडलो गेलो आहे. देहांगदानाच्या चळवळीसाठी मी समर्पित आहे. सोलापूरात जिथे पंधरा वर्षात एक बॉडी मिळाली होती, तिथे आज सोलापुरातून बॉडीज निर्यात होतात,हे या चळवळीचे मोठे यश आहे. या शहरातील देहदान चळवळीने आता चांगले बाळसे धरले आहे. आमच्या संस्थेबरोबरच, इतरही काही संस्था देह दानासाठी काम करत आहेत, आमच्या संस्थेवर भार हलका होत आहे,चळवळ यातून विस्तारत आहे. कधी काळी देहदानाची चळवळ रुजविताना आम्हाला लोकांकडे देणगीसाठी जावे लागायचे, आज स्वतःहून लोक आमच्या संस्थेत येऊन देणगी देऊन जातात, हे आमच्या संस्थेसाठी मोठे गुडविल आहे. आम्ही आजवर देहदान चळवळीसाठी जे काम केले त्याचे सार्थक झाले, लोक विश्वास ठेवतात, सोलापुरात चळवळ मोठी झाली यातच आम्ही धन्य झालो. जीवनाचे सार्थक होत आहे असे वाटते. ज्या कार्यासाठी वाहून घेतले, ते कार्य सफल होत आहे याचा आनंद आणि मोठे समाधान आहे.

भक्ती जाधव

भक्ती जाधव

भक्ती जाधव, जलकन्या आणि देहदान चळवळीच्याआघाडीच्या कार्यकर्त्या

जीवंतपणी तर आपण सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी बरेच काही करू शकतो. पण आपल्या मृत्यूनंतरसुध्दा समाजासाठी आपण उपयोगी ठरतो.देह, नेञ आणि अवयव दान यातून समाजासाठी मोठे 'गिफ्ट' देऊ शकतो, ते देण्याची मोठी संधी आहे. सोलापुरातील देहदानाच्या चळवळीत सक्रिय राहताना, आजवर मी तब्बल ५६ जणांना देहदानासाठी तयार करुन तसे कागदपत्री सोपस्कार करून मी घेतले आहेत. आमच्या घरातलेच अकराजण देहदान करणार आहेत. मिञ मंडळी, नातेवाईक आणि इतर यांच्याकडे जाऊन देहदानासाठी त्याची मानसिकता तयार करुन फॉर्म भरून घेण्याचे काम अखंडपणे सुरु आहे. अनेकजण आपला वाढदिवस किंवा इतर आनंदाचे क्षण देहदानाच्या संकल्पनेने साजरा करतात, मी त्यांच्यासाठी खास प्रयत्न करते. मेडिकल सायन्स आणि लोकभावना यांच्या संयोगातून मी या चळवळीसाठी योगदान देत आहे. त्यात मोठे यश येत आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या देहाचा केवळ गरजू लोकानांच उपयोग व्हावा,यासाठी योग्य ठिकाणी देहदानाचे सोपस्कार व्हावेत. अपरिचित व्यक्ती किंवा अपरिचित संस्था यांच्यासोबत देहदानासंदर्भात निर्णय होऊ नये.

 विलासभाई शहा

विलासभाई शहा

विलासभाई शहा, प्राणी मिञ देहदान चळवळीचे मुख्य प्रवर्तक

सोलापूर जिल्ह्यात देहदानाची चळवळ रुजविताना, देह दानाचा आपण पहिला फॉर्म भरला. शिवाय माझ्या माढा तालुक्यात देहदानाची चळवळ राबविताना हा तालुका अग्रेस राहिला याचा वेगळा अभिमान आहे. मृत्यू

नंतर आपला देह जाळला जातो, किंवा पुरला जातो. यातू एकतर देहाची माती होते किंवा राख होते, धड जाळण्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे लक्षात घेण्याबरोबरच, मृत्यूनंतर आपला देह इतर सहाजणांसाठी उपयोगी ठरणार असेल, आपल्या मृतदेहाने सहाजणांना जीवदान मिळणार असेल, हे सुंदर जग पुन्हा पाहता येणार असेल, तर आपला मातीत जाणारा देह दानातून उपयोगी आणण्याची कल्पनाच मुळी सुखावणारी आहे. परंतु, अंधश्रद्धाआणि रूढी परंपरेच्या चिटकवून न देहदानासाठी पुढे येण्याची गरज आहे. सोलापूर जिल्ह्यात घेतानाची चळवळ रुजत असताना बरेच काही करता आले याचे मोठे समाधान आहे. देहदान चळवळीसाठी ज्यांनी योगदान दिले, त्यांचे कार्य समाजापुढे अत्यंत आदर्शवत आहे. देह दानाची सोलापूर जिल्ह्यातील विस्तारलेली चळवळ पाहून समाधान वाटते. प्रत्येकाने देहदान नेत्रदान अवयव दान करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे.

डाॅ. अंजली गोसावी

डाॅ. अंजली गोसावी

डाॅ. अंजली गोसावी, शरीर रचना शास्त्र विभाग प्रमुख, अश्विनी रुग्णालय आणि संशोधन संस्था कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर.

कोरोना महामारीच्या काळात देह स्विकारले जात नव्हते. मात्र त्यानंतरच्या काळात देह आता स्वीकारले जाऊ लागले आहेत. मेडिकल कॉलेज यांना देह देण्याचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. तथापि, मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देह मिळण्याची कोणतीही अडचण नाही. प्रत्यक्ष

देहाचा अभ्यास करून मेडिकलचे विद्यार्थी शरीर रचनेच्या अभ्यासात तरबेज होते आहेत.सोलापुरातील देहदानाच्या चळवळीत अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन संस्थेचे मोठे योगदान आहे. मृत्यूनंतर देह आणणे आणि त्याचे पुढील सोपस्कार हे या रुग्णालयाच्या वतीने मोफत पार पाडले जात आहेत.

सोलापूरात या महाविद्यालयांना दिल्या जातात बॉडीज

डाॅ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अश्विनी ग्रामीण रुग्णालय आणि संशोधन संस्था कुंभारी, आयुर्वेदिक महाविद्यालय होमिओपॅथिक काॅलेज यांना दिले जातात देह. ज्या मानवी देहांवर इथल्या कॉलेजचे विद्यार्थी अभ्यास करतात.

तब्बल १५ वर्षात मिळाला होता एक मानवी देह

सोलापुरात १९६४ साली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. १९६६ ते १९७९ या काळात या महाविद्यालयास केवळ एक मानवी देह देह दानातून मिळाला होता.यावेळी तब्बल ५ लाख रुपये देऊन मानवी देह आयात लागले होते. दरम्यान २०१० पासून देहदान चळवळीला सोलापुरात चांगला प्रतिसाद मिळाला‌. २०१० या वर्षात तब्बल १२ मानवी देह दानातून मिळाले. त्यानंतरच्या काळात मानवी देह मिळत गेल्याने सोलापुरातील वैद्यकीय महाविद्यालयांना मानवी देहांची चणचण भासली नाही. सध्या सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अश्र्विन रुग्णालय यांना वर्षभरात प्रत्येकी २६ याप्रमाणे मानवी देह दिले जातात. सोलापुरातील देहदान चळवळीच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला आहे.

सोलापपरातुन मानवी देहांची निर्यात

मानवी देहदान महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या सोलापूरातुन चक्क मानवी देहांची निर्यात होते. मेडिकल कॉलेज यांना लागणारे मानवी देह सोडून विजापूर, गुलबर्गा आंबेजोगाई आदी ठिकाणी मानवी देह मेडिकल कॉलेजसाठी पाठवले जातात. जिथे सोलापुरात पंधरा वर्षात एक मानवी देह मिळाला होता, त्याच सोलापुरातून आता मानवी देहांशी निर्यात होते ही इथल्या देहदान चळवळीची फल निष्पत्ती आहे, हे वेगळे सांगण्याची गरज लागत नाही. देहदान चळवळीसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठी ही भूषणावह गोष्ट आहे.

एक कॉल अन् काम फत्ते !

सोलापूरची देहदान चळवळ आणि संबंधित वैद्यकीय संस्था या अपडेट्स झाल्या आहेत. एक कॉल केल्यानंतर लगेच मृत व्यक्तीच्या ठिकाणी ॲम्बुलन्स येते आणि मानवी देह घेऊन जाऊन जाते. त्यावरील पुढचे सगळे सोपस्कार पूर्ण होतात. एक कॉल आणि काम फत्ते असा प्रकार आहे.

३ दिवसांपर्यंत बघता येतो मानवी देह

देहदान केलेला मानवी देह बघावा अशी काही नातेवाईकांची इच्छा राहते, या पार्श्वभूमीवर, नातेवाईकांना देहदान झाल्यापासून पुढच्या तीन दिवसांत तू मानवी देह पाहता येतो. तशी सोय सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि संशोधन संस्था कुंभारी येथे आहे.

देहदानाचा नातेवाईकांना बदला येतो निर्णय

मानवी देहदान हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. कुटुंबांतील वा नातेसंबंधांमधील एखाद्या व्यक्तीने देहदान करण्याचा संकल्प केला आणि तसा फॉर्म भरून दिला. मात्र संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांचा विचार बदलला. तर हे नातेवाईक आपल्या मृत व्यक्तीचा देहदानाचा निर्णय बदलू शकतात. मानवी देहदान हे पूर्णपणे ऐच्छिक आहे, देहदान होऊ द्यायचे नाही, असे ते ठरवू शकतात.

देहदानाच्या चळवळीमधील पहिले पाच शिलेदार

गेली अनेक वर्ष सोलापुरात देहदानाची चळवळ सुरू आहे या चळवळीला खऱ्या अर्थाने योगदान दिले ते श्री चंदूभाई देडिया, श्री विलास भाई शहा नारायण दुमालदार, अरुण गोरटे आणि डाॅ. प्रकाश मटकर.

मानवी देहावर अंत्यसंस्कार करून त्याची माती किंवा राख करण्याऐवजी या देहापासून सहा जणांना पुन्हा हे सुंदर जग पाहता येऊ शकते, सुंदर आयुष्य जगता येऊ शकते. देहदान हे पुण्यकर्म आहे, मोठी सामाजिक भेट आहे, मृत्युनंतरसुध्दा इतरांना काहीतरी देता येते या संवेदनशील जाणीवेतून आणि भावनेतून देहदानाबद्दल लोकांच्यामध्ये प्रबोधन व्हायला हवे जनजागृती व्हायला हवी, ही मानसिकता बदलायला हवी. या पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत याचाच एक भाग म्हणून सोलापूरातील देहांगदान सामाजिक संस्थेने चंदूभाई देढिया यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल एक लाख जनजागृतीपर माहिती पञके वाटली.

व्यापारीकरणावर अंकुश हवा

एका व्यक्तीच्या नेञ, अवयव किंवा देह याच्या पवित्र दानामुळे तब्बल सहाजणांना पुन्हा आयुष्य जगता येते. पुन्हा हे सुंदर चे पाहता येते, त्यासाठी गरजू माणसापर्यंत हे दान पोहचले पाहिजे. दानाच्या या पवित्र आणि मानवतेच्या कार्यात कोणतेही व्यापारीकरण व्हायला नको. काही दृष्ट प्रवृतीचे लोक काही वेगळे साधण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्या मुस्क्या आवळल्या पाहिजेत. दानाचे सोपस्कार हे दातृत्व आणि मानवतेच्या भावनेतूनच व्हायला हवेत.

देहदानाचे सोपस्कार व्हावेत अधिकृत संस्थांमधून...

सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अश्विनी रुग्णालय आणि संशोधन संस्था कुंभारी देहंगदान सामाजिक संस्था सोलापूर या देहदानासंबंधीचे सोपस्कार पूर्ण करून घ्यावेत, अपरिचित व्यक्ती किंवा संस्था यांच्या मध्यस्थीने देहदानासंबंधी काही करु नये, फसगत होऊ शकते.

अजून काही हायलाईट्स...

* नेञ,अवयव आणि देह दान यासाठी वेगवेगळे फॉर्म भरून घेऊन, दान करु इच्छिणाऱ्यांना अधिकृत संस्थेमार्फत दिले जाते ओळखपत्र

* दानासंबंधी सहा तासांत उरकले जातात संपूर्ण सोपस्कार

* व्यापारीकरणातून देह, नेञ आणि अवयव यांच्या दानाला यायला नको तस्करीचे स्वरूप

* वाढदिवसाचे सेलिब्रेशन किंवा आनंदाच्या क्षणी अनेक परिवारात होतोय संकल्प

* देहदानासंदर्भात जुनाट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेची गळून पडताहेत कवचकुंडले

* वैद्यकीय महाविद्यालयात एका मानवी देहावर १० विद्यार्थी करता अभ्यास

'असा' मानवी देह नाही स्विकारला जात

नैसर्गिक मृत्यू दाखला डॉक्टरांनी दिल्याशिवाय वैद्यकीय कॉलेजांमध्ये देह स्वीकारला जात नाही. तसेच व्यक्तीचा सांसर्गिक रोगाने (कावीळ, गँगरीन, अपघात, एड्स, कॉलरा) मृत्यू झाला असेल तरीही देह स्विकारला जात नाही. देहदानाचे फाॅर्म शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच देहांग सामाजिक संस्था आदींकडे उपलब्ध आहेत

नैसर्गिक मृत्यू दाखला डॉक्टरांनी दिल्याशिवाय वैद्यकीय कॉलेजांमध्ये देह स्वीकारला जात नाही. तसेच व्यक्तीचा सांसर्गिक रोगाने (कावीळ, गँगरीन, अपघात, एड्स, कॉलरा) मृत्यू झाला असेल तरीही देह स्विकारला जात नाही. देहदानाचे फाॅर्म शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच देहांग सामाजिक संस्था आदींकडे उपलब्ध आहेत.