
जगप्रसिद्ध भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर 12 ऑगस्ट 2022 रोजी वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी प्राणघातक हल्ला झाला.
त्याचे कारण होते 1988 मध्ये प्रसिद्ध झालेली त्यांची कादंबरी, ``द सैतानिक व्हर्सेस.’’ 549 पानांची ही कादंबरी पेन्गिविनने प्रकाशित केली होती. त्यात इस्लाम धर्माची बदनामी केल्याचे कारण सांगून, इराणचे त्यावेळेचे सर्वेसर्वा नेते आयातोल्ला रोहोल्ला खोमेनी यांनी 14 फेब्रुवारी 1989 रोजी त्यांना ठार मारण्याचा फतवा काढला होता.