सह्याद्रीचा माथा : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचा दौरा अन् कानटोचणी

Jayant Patil, Arunbhai Gujarati, Satish Patil, Gulabrao Devkar, Sanjay Garud, Anil Gote, Ranjit Bhosale
Jayant Patil, Arunbhai Gujarati, Satish Patil, Gulabrao Devkar, Sanjay Garud, Anil Gote, Ranjit Bhosaleesakal

आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यभर सदस्य नोंदणी अभियान सुरु केलं आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. जळगाव आणि धुळे येथील जयंत पाटील यांचे दौरे विविध कारणांनी गाजले. अर्थात घडामोडी पक्षांतर्गत होत्या. जयंत पाटील यांचा सव्वा महिन्यातील हा दुसरा दौरा. राज्यात नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी हे दौरे होत असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. जळगाव जिल्ह्यातील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांना जयंत पाटील यांनी चांगलंच धारेवर धरलं तर धुळ्यातील गटबाजी या दौऱ्यात अधोरेखित झाली. (Saptarang Latest Marathi Article sahyadricha matha by dr rahul rahalkar Nashik News)

Jayant Patil, Arunbhai Gujarati, Satish Patil, Gulabrao Devkar, Sanjay Garud, Anil Gote, Ranjit Bhosale
कोरोनाने जोपासलेलं माणूसपण!

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आहेत. कदाचित गुजरातमधील निवडणुकांसोबत महाराष्ट्रात निवडणुका होणे शक्य असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. हिमाचल प्रदेशात निवडणुका घोषित झालेल्या आहेत. तिथं भाजपाला यश मिळाल्यास गुजराजसोबत महाराष्ट्रात निवडणुका लागू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जोरदार पक्ष बांधणीची मोहीम सुरु आहे. जळगावमध्ये जयंत पाटील आले असता, त्यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली.

पारोळा, चोपड्यात सदस्य नोंदणीचं काम फारस पुढे सरकलेलं नाही. चोपड्यात जागा लढवायची असेल तर मग कामं का होत नाहीत, असा सवाल ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांना विचारला. पारोळ्यातील कामांबाबतही प्रदेशाध्यक्षांनी अशाच स्वरुपाची नाराजी व्यक्त केली. त्यावर ज्यांना जबाबदारी दिली ते काम करत नाहीत, अशी भूमिका माजी आमदार सतीश पाटील यांनी मांडली. जबाबदारी बदलणं हे तुमचंच काम आहे, असं म्हणत जयंत पाटलांनी सुनावलं. लोकांमध्ये जाण्याची आत्ता गरज आहे असं म्हणतं, याला सांगितलं, त्याला सांगितलं असं सांगून चालणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेत जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले.

निवडणुकीची रणनीती आखण्याऐवजी जयंत पाटील यांचा पक्षांतर्गत डागडुजीवर अधिक वेळ खर्च होत आहे. जयंत पाटील यांनी सकल मराठा आंदोलनाला जळगावात भेट दिली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची उपोषणस्थळी भेट घेतली. हे राजकीयदृष्ट्या योग्य आणि आवश्यक देखील आहे. दुसरीकडे मात्र पक्ष संघटनेच्या कामात मी आता कोणतीही सबब ऐकणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला. मी या पदावर किती दिवस आहे, हे मला माहित नाही, पण अकार्यक्षम लोकांना मात्र मी हाकलून देईन, असा सज्जड दम देखील त्यांनी भरला.

जळगाव ग्रामीणमधील सध्याच्या परिस्थितीवर ज्ञानेश्वर महाजन यांनी विरोधाची भूमिका घेतली. आम्हाला काहीच सांगितलं जात नाही, अशी त्यांची तक्रार होती. त्यावर आपण सगळ्यांना सोबत घेऊन जातो, असं गुलाबराव देवकर म्हणाले. त्यापाठोपाठ जळगाव ग्रामीणचा उमेदवार आत्ताच जाहीर करुन टाका, मी त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करायला तयार आहे, अशी भूमिका गुलाबराव देवकर यांनी मांडली.

जामनेरमध्ये केवळ नेत्यांनी फिरुन उपयोग नाही, कार्यकर्त्यांना बळ द्या, अशी सूचना वजा दम जयंत पाटील यांनी संजय गरुड यांना भरला. निवडणुकीच्या काळात केवळ शिक्षकांना फिरवून काय उपयोग, असेही गरुडांना सुनावले. फॉर्म भरल्यावर शिक्षक प्रचार करतात, पण समाजातील लोक शिक्षकांना ओळखत नाही. त्यापेक्षा कार्यकर्त्यांना आत्तापासून मतदारसंघात फिरवा.

Jayant Patil, Arunbhai Gujarati, Satish Patil, Gulabrao Devkar, Sanjay Garud, Anil Gote, Ranjit Bhosale
परिवर्तनाच्या बीजांची रुजवात

ऐनवेळी लोक-कार्यकर्ते तुमच्यासाठी का काम करतील, असा प्रश्नही पाटलांनी उपस्थित केला. पक्ष वाढवण्याची ही पद्धत नसून आत्तापर्यंतच्या निवडणूक निकालातून हे स्पष्ट झालंय. म्हणूनच कार्यकर्त्यांमध्ये जा, मिसळा, जबाबदाऱ्या सोपवा अशी जोरदार कानटोचणी जयंत पाटील यांनी केली. नेत्यांनी लोकांमध्ये जायला हवं. लोक तुमच्याकडे येतील अशी अपेक्षा धरणं चूक असल्याचं सर्व उपस्थितांच्या लक्षात आणून दिलं.

धुळ्यात आगमनानंतर सदस्य नोंदणीचा आढावा राहिला बाजूला, गटबाजी सांभाळताना जयंत पाटलांना नाकेनऊ आले. एका गटाच्या बॅनरमध्ये प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या अनिल गोटे यांचा फोटो नव्हता. त्यावरुन चांगलाच राडा झाला. अनिल गोटे हे धुळे-नंदुरबारचे राष्ट्रवादीचे प्रभारी देखील आहेत. गोटे समर्थकांनी फोटो बॅनरवर नसल्यानं राडा केला. बैठक आटोपल्यावर जयंत पाटील यांना गाडीतून उतरवून बॅनर दाखवण्यात आले. पक्षशिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई करु, असे सांगत जयंत पाटील यांनी विषयाला पूर्णविराम दिला. मात्र यामुळे धुळे राष्ट्रवादीत दुफळी असल्याचं प्रकर्षानं समोर आलं. अनिल गोटे यांचं पक्षात राहणं अनेकांना खुपणारं आहे. धुळ्यातून विधानसभेसाठी अनेक इच्छुक आहेत.

धुळे शहराध्यक्ष रणजीत भोसले हे त्यातील एक. शहरातून अनिल गोटे देखील इच्छुक आहेत. आणखी दमदार उमेदवार मिळाला, तर त्याचाही धुळ्यातून विचार होऊ शकतो. शिंदखेड्याची जागा राष्ट्रवादीकडे आहे. शिंदखेड्यात राष्ट्रवादी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. धुळे शहरात मात्र जुने आणि नवे असा वाद या निमित्तानं समोर आहे. सभासद नोंदणीच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्या. सभासद नोंदणीवर लक्ष देणाऱ्यांना पदं आणि उमेदवारीचा विचार होईल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार धुळे दौऱ्यावर आले होते. तेव्हा अनिल गोटेंनी उघड भूमिका घेतली. गटबाजी असेल तर पक्ष मजबूत करणे कठीण असल्याचं ते पवार यांना म्हणाले. त्यानंतर गोटे यांनी शरद पवार यांना मल्हार बागेत जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, शरद पवार यांनी शहराध्यक्ष रणजीत भोसलेंकडे जाणं पसंत केलं. तेव्हापासून धुळ्यात राष्ट्रवादीतील दोन गटांमध्ये वाद धगधगतोय. आता धगधगणारे वाद शमवायचे की पक्ष बांधणी करत निवडणुकांसाठी सज्ज व्हायचं हे ठरवण्याची वेळ राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

Jayant Patil, Arunbhai Gujarati, Satish Patil, Gulabrao Devkar, Sanjay Garud, Anil Gote, Ranjit Bhosale
‘अष्ट’पैलू महानायक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com