भारत सरकारचे स्वच्छता अभियान केवळ पुरुषांसाठीच आहे का?

भारत सरकारचे स्वच्छता अभियान केवळ पुरुषांसाठीच आहे का?

धी कधी नको वाटतो महिलेचा जन्म. मस्त पुरुष झाले असते, तर माझ्या समोरचे अनेक प्रश्न अगदी लीलया सुटले असते. हे प्रश्न यशस्वी होण्याचे नव्हेत तर अगदी साधे आहेत. हा म्हणजे, दूरवरच्या प्रवासात स्वच्छतागृह कुठं शोधायचं हा मुख्य प्रश्न आजकाल प्रत्येक महिलेला पडतोय.

गेल्याच महिन्यात माझ्यासोबत घडलेला प्रसंग. सायंकाळ साडेसहाची वेळ. मी स्वच्छतागृह शोधत होते. तुम्ही म्हणाल, कोल्हापूरसारख्या शहरात तुला सहजच मिळालं असेल स्वच्छतागृह, पण नाही ओ. लाज वाटतेय हे सांगायला की, मला 2 तास तरी स्वच्छतागृह कुठेच मिळाल नाही. अखेर वैतागून जेव्हा मी घरी यायला निघाले, तेव्हा समोरच असलेल्या एका नाट्यगृहात स्वच्छतागृह आहे हे लक्षात आलं. तिथे असणाऱ्या गार्डना मी विचारलं. पण, त्यांनी नकार दिला. अखेर विनंती केल्यावर त्यांनी मला स्वच्छतागृहात जाण्याची परवानगी दिली. या दोन तासांच्या माझ्या कठीण काळात मला काय काय सहन कराव लागलं त्याबद्दल तर काहीच बोलण नको. बरं, या वेळेत मी एका हॉटेलमध्येही जाऊन आले. पण, तिथं नेमकं महिलांचे स्वच्छता गृह बंद होतं. असो, जे झालं ते झालं. पण यावर इतकंच वाटत की, अजून किती वर्ष महिलांनी केवळ स्वच्छतागृह शोधण्यात जाणार आहेत कोणास ठाऊक. हा प्रश्न कधी सुटेल माहीत नाही. पण, यामुळे आम्हाला भलताच त्रास सहन करावा लागत आहे.

स्वच्छतागृहांच्या वेटिंगच्या नादात अनेक महिलांना शारीरिक त्रास सहन करावा लागतोय. याचे अनेक गंभीर परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत आहेत. अनेकवेळ युरिन बाहेर न टाकल्याने पोट दुखीचा सामनाही त्यांना करावा लागतो. पण, ठीक आहे इतकं काय? करतील सहन? नाहीतरी सगळं सहन करायचा मक्ता महिलांकडेच आहे ना? मेट्रो सिटीमध्ये महिलांसाठी या सुविधा उपलब्ध आहेत. पण कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर सारख्या ठिकाणी मात्र महिलांना स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. एखाद्या गावच्या बस स्थानकावर असतील तितकीच काय ती आमची सुविधा. त्यातच आम्ही समाधान मानायचं. गेल्याच वर्षी घरचे सगळे मिळून देव दर्शनासाठी गेलेलो. साहजिक तिथं स्वच्छतागृहाची सुविधा नव्हती. अनेक देवस्थान समिती याची काळजी घेतात. येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी सतर्क असतात. पण, व्हायची तशी महिलांची गैरसोय होतेच. प्रवासात अनेकवेळा गाडी थांबवून पुरुषमंडळी जाऊन यायची. पण महिलांचा मोठा प्रश्न आणि हा प्रश्न कधी सुटेल काही कल्पना नाही.

महाराष्ट्रातील अनेक गाव अशी आहेत जिथे वीज, रस्ते पाणी प्रश्न तर सुटले पण महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर आहे. एक महिला म्हणून याची खंत वाटते की आजही आरोग्य आणि स्वच्छता याबाबतीत महिलांकडे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे जिथे महिला सर्जिकल स्ट्राईक सारख्या मोहिमेत पायलट होतात, तर दुसरीकडे तिला स्वच्छता गृह शोधावी लागतात. अनेकवेळा मासिक धर्मात महिलांना स्वच्छता गृहांची अत्यंत गरज असते. पण, त्यावेळीही अनेकींना मानसिक त्रास सहन करावा लागतो. कधी कधी हा प्रश्न पडतो की, भारत सरकारचे स्वच्छता अभियान केवळ पुरुषांसाठी आहे का? पुरुष उघड्यावर काहीही करू शकतात पण महिलांनी केलं तर त्यांना नाव ठेवणारे अनेक महाभाग भेटतील. हा ब्लॉग मला झालेल्या त्या त्रासमुळे नाही लिहिला. तरं खरंच यावर काहीतरी विचार होणं आणि कृती होणं गरजेच आहे. अनेक उत्सव साजरे होतात, त्यावेळी महिला व पुरुष दोघांसाठीही स्वच्छतागृह बनवली जातात. पण, केवळ उत्साहात आणि सण समारंभात अशी सोय नको तर प्रत्येक क्षणी हवी. यावर खरंच काहीतरी कृती होणं गरजेच आहे.

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com