कोपल गोयल : अडव्हेंचरस् कॅमेरावुमन!

कोपल गोयल : अडव्हेंचरस् कॅमेरावुमन!

- सायली महाराव

मूळची बिहार शहरातली कोपल गोयल. करिअरबाबl तिच फार काही ठरलेलं नव्हते. ग्रज्युऐशनचं शिक्षण सुरू केल्यानंतर आपण काय करू शकतो हे कळू लागलं. तिने असं क्षेत्र निवडलं ज्याची काळानुसार व्यापती वाढणार आहे ते क्षेत्र होतं journalism. त्या क्षणी सुध्दा तिला वाटलं नव्हतं कि, ती डॉक्युमेंटरी फिल्ममेकर बनू शकेल. भारतात बोटावर मोजण्या इतक्या महिला या क्षेत्रात नाहीत, पण आज कोपलने या क्षेत्रामध्ये नाव मिळवलं आहे.

डॉक्युमेंटरी फिल्ममेकर या क्षेत्राला करिअर करण्यासाठी तिच्या घरच्यांचा मात्र फारसा चांगला प्रतिसाद तिला मिळाला नाही. त्यांना हिला यातून काय मिळू शकतं हे घरच्यांना समजावणे तिच्यासाठी फार कठीण होतं. तिने काही क्लाईंबर्सना, क्लाईबिंग करताना बघितलं आणि तेव्हा लोकांपर्यंत ते पोहचवण्याचा विचार तिच्या मनात आला. साहजिकचं तेव्ह हे सगळं काही सोपं नव्हतं तरीही canon 7D मध्ये डोंगरावर क्लाईंबिंग करण्याचं शुटिंग करायला सुरूवात तिने केली. हळूहळू तिला हेच पुढे सुरू ठेवू या हा विचार आला. डोंगरकड्यांवर तीही रमू लागली.

कोपल गोयल : अडव्हेंचरस् कॅमेरावुमन!
Women's Day 2022 : महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या कमल कुंभार आहेत कोण?

अडव्हेंचर फिल्मचा तीचा श्रीगणेशा सुरू झाला, तो गणेशा स्पोर्ट क्लाइंबिंग रूट जो सगळ्यात कठीण श्रेणीत मोजला जातो त्या क्लाईबिंग स्टोरीपासून. त्यांचे शुट केल्यानंतर तीचा आत्मविश्वास असाच उंचावला कि, माझ्या फिल्मच्या माध्यमातून मी लोकांना स्टोरी सांगू शकते असे तिला वाटत होते पण, कॅमेऱ्यामध्ये अशा विशेष काही लेन्स तिच्या जवळ नव्हत्या. तरीही तीची इच्छाशक्ती कायम होती कि, मी स्टोरी बनवू शकेन.

गणेशा 8b+ ही कोपलने तयार केलीली पहिली लघूपट (Documentary) फिल्म होती. त्यानंतर तिने ज्या फिल्मसाठी मेहनत घेतली ती तिची उंच गगन भरारी आहे. पण खरे तर या प्रोजेक्टसाठी पुरेसे पैसे ही नव्हते. अनेक आव्हाने, प्रवास ही तितकाच अनुभव देणारा होता. या प्रोजेक्टच्या विषयावर अनेक लोकांनी शंका व्यक्त केल्या. ''भारतात तुला कुठे मिळणार paragliding करणार या मुली, कुठे करतात मुली स्केटबोडिंग ? कुठे ice climbing करतात मुली? कुठे water स्पोर्टला जातात मुली? कोण करतं Downhill Mountain biking ? अश्या मुली मिळणारचं नाहीत.'' कोपल ने भारतताल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून अशा जिद्दी मुली आणि महिला शोधल्या आणि त्याच महिलां आणि मुलींवर 'प्रोजेक्ट वाइल्ड वुमन"तयार झाली.

कोपल गोयल : अडव्हेंचरस् कॅमेरावुमन!
महिला दिनापासून सुरु होणार सैन्य दलामध्ये महिलांची भरती, अर्ज कसा करावा?

कोपल सांगते की, या documentray मधील महिला व मुलींच्या मदती शिवाय ही फिल्म बनवणं अशक्यच होतं आणि आज "प्रोजेक्ट वाइल्ड वुमन" आंतरराष्ट्रीय स्तरावर 'Banff फिल्म फेस्टिवल 2020' , 'लंडन माऊंट फिल्म फेस्टिवल' त्याच बरोबरीने अनेक पुरस्कांनी सुद्धा सन्मानित केली गेली. 'पिपल्स चॉईस् ऑवर्ड' , 'अॅडव्हेंचर अनकव्हर' फिल्म फेस्टिवलमध्ये 'टॅलेन्ट हॉर्ड'चा सन्मान तिने मिळवले.

आज पर्यंत गणेशा 8b+ , प्रोजेक्ट वाईल्ड वुमेन , 'कोकणकडा' , 'The Rakchham Aaire' अनेक उत्कृष्ट दर्जाच्या फिल्मस् कोपलने बनवल्या आहेत. कोकणकड्याची फिल्म तिने शिवम अहिर बरोबर पुर्ण केल्याचं ती सांगते. महिला Documentary Filmmaker म्हणून लोकांना आजही प्रश्न पडतो की, ''ही महिला त्याच ताकदीचे काम करू शकते का जो पुरूष वर्ग या क्षेत्रात करतो? तरीही आज या सगळ्यातून कोपलने प्रत्येक डोंगरकड्यावर चढाई करून, जिद्दीने अन् मेहनतीने तिची प्रत्येक फिल्म पूर्ण केली आहे. तिच्या फिल्ममधून ती लोकांपर्यंत पोहचते तिने स्वतः भारतातील वुमन फिल्ममेकर म्हणून तिची ओळख तयार केली आहे. स्वत : ची Inspire Crew नावाची Nonprofit organization तयार केली ज्यामध्ये ती महिला - मुलीं ज्या Sport मध्ये आहेत त्यांना प्रोत्साहन आणि आधार देण्याचे काम की करते .

कोपल सांगते कि, दुसऱ्यांना सिध्द करण्यासाठी काम करू नका, तुमच्या आनंदासाठी करा. अजून अनेक नवीन गोष्टी मला सुद्धा शिकायचे आहे, मला माझ्या कामातून हेच सांगयचं की, चूका होतात पण शिकण्याचा मार्ग हा रंजक आणि अनुभव देणारा आहे. चूका करण्याला घाबरू नका त्यांतून शिका. आज माझ्यासाठी सुध्दा प्रत्येक दिवस काही तरी नवीन शिकवून जाणारा आहे . या क्षेत्रात महिलांनी न घाबरता पाऊल टाकलं पाहिजे हे मला कायम वाटतं. अडव्हेंचर फिल्म मधून आपल्याला नवीन चेहऱ्यांची ओळख होते. मला या फिल्म बनवताना एक वेगळाच आनंद मिळतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com