

Sunetra Pawar DCM controversy
ESakal
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झालं. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत बरीच उलथापालथ दिसून येत आहेत. नवीन सत्तासमीकरणे जुळवण्यासाठी पक्षात अंतर्गत कुरघोडी सुरू झाल्या आहेत. अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्रीपद त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे गेले आहे. त्यांचा आज शपथविधी पार पडला आहे. याआधी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत गोप्यस्फोट केला आहे. यामुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे. ही सकाळची शरद पवारांची पत्रकार परिषद केवळ प्रतिक्रिया म्हणून पाहिली, तर प्रत्यक्षात ती एक पूर्ण राजकीय संवादयोजना होती. शब्द कमी, पण अर्थ बहुपेडी. प्रत्येक वाक्य हे कोणासाठी तरी होतं आणि प्रत्येक मौनातही संदेश होता.