Likhita Japa: असा हा जीवनपटावरील श्रीगणेशा!

Ganesh Vidya: श्रीगणेशविद्येचा जीवनपट, मूलाधार चक्रातील नाळ आणि कलियुगातील साधनेची गरज
likhita japa

likhita japa

Updated on

 - श्रीराम भट 

स्वर आणि व्यंजनांना वाव किंवा अवकाश देणाऱ्या या आकाशात कोण बरे वावरत असते? अर्थातच, ‘ख’काराच्या आकाशात कोणत्या आग्रहाची गती वावरत असते? याचा शोध घेणारी विद्या तीच श्रीगणेशांची 'श्रीगणेशविद्या' होय! 

'अ', 'आ', 'इ', 'ई', यांचा स्वर पकडत 'ख' नावाच्या आकाशात ‘क’ व्यंजनाचा आधार घेत अर्थात मी कोण आहे? किंवा मी कोणत्या आग्रहाला घट्ट पकडून वावरणारी गती आहे, याचा शोध घेणारी, मूलाधार चक्रापासून मूळ नाभिस्थानी जन्म पावणारी जी परावाणीची नाळ आहे, ती अर्थातच शब्दब्रह्माला जन्माला घालणारी ही अखिल ब्रह्मांडाची माता म्हणजे श्रीगणेशविद्या ! अर्थात, हीच आदिप्रकृतीच्या जगत्प्रपंचाचा श्रीगणेशा होय! हे जगताचे आधारकार्डच होय!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com