
रतन चौधरी.
( गुजरात सिमेलगत बारागाव डांग भागात साजरी करण्यात येणारी होळी)
आदिवासी बांधवांची होळी.अग्नी देवतेची पूजा..निसर्गाचा प्रकोप दु:ख जाळी..
" होळी बाय तू भोळी व सदा शिमगा खेळीव..! होळी बायला मनाशूं पहिलं कापड चढावशूं..! याप्रमाणे नारळ, हारडे, करडे , वाट्या, खारका, पापड्या अशा वर्णनाची गाणी शिमगा सणाला आदिवासी भागात कानावर पडतात. आदिवासी भगिनींनी सुमधूर आवाजात गायलेली पारंपरिक गाणी कानाला सुमधूर वाटतात. आदिवासी बांधवांकरीता होळीचा सण महत्त्वाचा आहे. कोणत्याही रोजगार, नोकरी, कामधंदा निमित्ताने बाहेरगावी असतील तरी थोडा वेळ काढून सण साजरा करण्यासाठी आपल्या मुळ गावी परत येतात.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश ,गुजरात,राजस्थान या राज्यातील आदिवासी जमाती कोकणा,कोकणी, कुकणा, डांग जिल्ह्यातील कुणबी आदिवासी, कोळी महादेव,वारली,कातकरी,पारधी, ठाकर,भिल्ल,भिल्लाल, पावरा, मावची, तडवी, गामित या सह्याद्री व सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी जमाती दिवाळी व होळी हे दोन्ही सण उत्साहात साजरे केले जातात.