

BMC Election Thackeray Brothers
ESakal
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता राज्यभर जोरात सुरू झाली आहे. महायुतीने प्रचाराचा फुल गिअर टाकल्याचे दिसून येत आहे. महायुतीच्या प्रचाराची गाडी सुस्साट धावत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि बडे नेते सभा तसेच रोड शो घेत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. ग्रामीण भाग असो वा महानगरे महायुतीची यंत्रणा पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी बीएमसी निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये मुंबईच्या विकासाचे आश्वासन देण्यात आले आहे. बीएमसी निवडणुकीत "ब्रँड ठाकरे" ची विश्वासार्हता पणाला लागली आहे.