दप्तराचे वजन कागदोपत्रीच!

file photo
file photo

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी ठेवण्याबाबतचे निर्णय यापूर्वी अनेकदा शिक्षण विभागाने घेतले. याबाबतच्या सूचनाही शाळांना देण्यात येतात; पंरतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी झाले नसल्याचे, मुख्याध्यापकच खासगीत सांगत आहेत; परंतु शिक्षण अधिकारी दप्तराचे वजन कमी झाल्याचा दावा करत असल्याने दप्तराचे वजनही कागदावर राहिले आहे.

आधीच्या तुलनेत दप्तराचे ओझे फारच कमी झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला नवे निर्देश देण्याची आवश्‍यकता भासत नसल्याचे स्पष्ट करत २०१५ पासून दप्तराच्या ओझ्याबाबत प्रलंबित असलेली जनहित याचिका न्यायालयाने निकाली काढली. त्यामुळे पुन्हा विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवली आहे. याचा अहवाल दरमहा शिक्षण विभागाला सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत; परंतु अधिकारी शाळांमध्ये जाऊन पाहणी करण्याऐवजी कागदोपत्री अहवाल सादर करत असल्याचे, शिक्षक खासगीत सांगतात.

काही शाळांनी विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विविध प्रयोग केले आहेत; परंतु अनेक पालक याबाबत जागरूक नसल्याने विद्यार्थ्यांचे दप्तर जड होत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन करण्यासाठी वजन काटे देण्यात आले आहेत. त्यावर विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन करण्यात येते. त्यानुसार पूर्वीपेक्षा विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी झाले आहे. दर महिन्याला याचा अहवाल तयार करण्यात येत आहे. 
- प्रकाश चऱ्हाटे, शिक्षणाधिकारी, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com