चला, बनूया सिटिझन जर्नालिस्ट...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

पोलिस वाहनातून अनधिकृत वाहतूक
बाणेर या ठिकाणी पोलिस वाहनातून अनधिकृतपणे जड सामानाची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे. शहर आणि उपनगरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतात. मात्र, पोलिसांनी नियम न पाळल्यास कोणतीही कारवाई केली जात नाही. कायदा सर्वांना समान असल्याने पोलिसांवरही कारवाई होणे गरजेचे आहे.
- एक नागरिक 

पोलिस वाहनातून अनधिकृत वाहतूक
बाणेर या ठिकाणी पोलिस वाहनातून अनधिकृतपणे जड सामानाची धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे. शहर आणि उपनगरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतात. मात्र, पोलिसांनी नियम न पाळल्यास कोणतीही कारवाई केली जात नाही. कायदा सर्वांना समान असल्याने पोलिसांवरही कारवाई होणे गरजेचे आहे.
- एक नागरिक 

घरपट्टी कमी करावी
आम्ही बावधन खुर्द या ठिकाणी राहतो. यंदाच्या वर्षी घरपट्टीची बिले वाढवून आली आहेत. ती कमी करण्याची मागणी केल्यास, ‘या वर्षी भरा, पुढील वर्षी कमी करू’, असे उत्तर देण्यात आले. आमचे घर औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असून, तक्रार केल्यानंतर कार्यालयाचे अधिकारी घरी येऊन पाहणी करून गेले. मात्र, त्यांनी नव्याने फॉर्म भरायला सांगितला आहे. पुढील वर्षी घरपट्टी कमी केली जाईल, असे लेखी दिले जात नाही.
- प्राजक्ता नेने

रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे
वडगाव बुद्रुक येथील जाधवनगर गल्लीत नवीन रस्ता करून दोन महिने झाले आहेत. मात्र, जिओची पाइपलाइन टाकण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला आहे. तसेच खोदण्यात आलेल्या रस्त्याचे काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. या रस्त्यावर सतत अपघात होत असल्याने संबंधित विभागाने रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
- एक नागरिक

मजूर सुरक्षा सामग्री वापरत नाहीत
शहरात मोठ्या प्रमाणात इमारतींची बांधकामे सुरू आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना सुरक्षा सामग्री उपलब्ध करून दिली जाते. मात्र, मजूर कोणतेही साहित्य वापरत नाहीत. इमारतीत काम करताना स्टंटबाजी करतात. अशावेळी एखादा अपघात घडल्यास बांधकाम व्यावसायिकाला जबाबदार धरले जाते.
- निखिल परदेशी

बेवारस वाहन तातडीने हलवावे
कात्रज येथील जांभूळवाडी रस्त्यावरील लिपाणे वस्तीजवळ गेल्या वीस दिवसांपासून चारचाकी वाहन उभे आहे. यामुळे सकाळी व सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. संबंधित विभागाने पादचारी आणि वाहनचालकांना अडथळा ठरणारी चारचाकी लवकर हटवावी.
- एक नागरिक

बातमी पाठविताना नाव व ठिकाणाचा अवश्‍य उल्लेख करा

Web Title: citizen journalist