#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
पुणे : डहाणूकर कॉलनी येथे मुख्य रस्त्याचा वापर कर्वेनगर- वारजे परिसरतील शेकडो नागरिक रोज करतात. डहाणूकर कॉलनीत सातव्या दिवशी तीन-चार मंडळांच्या विसर्जन ढोल पथकांसहित एका पाठोपाठ एक विसर्जन मिरवणूका संध्याकाळी ६ नंतर म्हणजेच घरी परतणाऱ्या नोकरदार नागरिकांच्या वाहतुकीच्या वेळेत असतात. मिरवणूकासाठी मुख्य रस्ता पूर्ण बंद केल्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. गांधीभवनकडून डहाणूकर कॉलनी मार्गे कर्वेनगर वारजेकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कमिन्स कम्पनी मेनगेटपाशी येऊन परत फिरावे लागते. तीच अवस्था कर्वेनगर वारजे कडून येऊन सहजानंद - महात्मा सोसायटीकडे जाणाऱ्या वाहनचालकाची होते. यात वेळ, श्रम आणि इंधन यांचा अपव्यय होतो. डहाणूकर कॉलनीच्या मुख्य रस्त्याची एक बाजू मोकळी सोडली तर वाहनचालकांना पडणारा वळसा टाळता येऊ शकतो. वाहतूक पोलिसानी मंडळांना पूर्ण रस्ता न अडवण्याबाबत सूचना द्यावी. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील समाजहिताचा विचार करून आळीपाळीने अप आणि डाऊन वाहने सोडण्यास पोलिसांना मदत करावी.