बेवारस गाड्यांचा वाहतुकीस अडथळा

शिवाजी पठारे
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

कोथरूड : कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कॅनॅल रस्त्यावर सर्वत्र बेवारस वाहने पार्क केली आहेत. मारूती मंदिरच्या मागे ज्या ठिकाणी रस्ता अरूंद आहे त्याठिकाणीच ही कार पार्क केली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ही बेवारस वाहने चोरीची सुध्दा असू शकतात. महापालिकेने व वाहतुक पोलिसांनी याची दखल घेऊन बेवारस वाहने उचलण्याची गरज आहे. तसेच संबंधित वाहन मालकांवर कारवाई करून संबंधितांकडून पार्किंग शुल्क वसूल केले तरच या प्रकारांना आळा बसेल.

 

Web Title: Disturbance due to unknown vehicles parked on road in Pune