रंकाळ्याचे साैेदर्य जोपासण्याची गरज

अनिल शिंदे
बुधवार, 31 जानेवारी 2018

कोल्हापूरात मूल जन्मल्यानंतर रांगायला घरात शिकते आणि चालायला रंकाळयावर शिकते. अशा प्रघात आजही आहे. कोल्हापूरकरांच पहिलं प्रेम, कोल्हापूरची ओळख आणि राजर्षी शाहूंची दुरदृष्टी असलेला रंकाळा.. आज मात्र दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकला आहे.

कोल्हापूराच्या पर्यटनांत महत्व असूनही या तलावाकडे दुर्लक्ष होते आहे. बाजूच्या उपनगरातून मिसळणारे सांडपाण्यामुळे रंकाळ्याचे पाणी दुषित होत आहे. पाणी हिरवट होते. याकडेही लक्ष देऊन पाण्याचे प्रदुषण रोखण्यावर उपाय होणे गरजेचे आहे. येथील संध्यामठाची दुरावस्था झाली आहे. बाजूला उगवलेल्या पाणवनस्पती, उद्यानाजवळ हिंडणाऱ्या म्हैशी..रंकाळा टाॅवरजवळ उगवलेले तण, वेली झुडपं यामुळे हा परिसर अस्वच्छ वाटतो. येणारे पर्यटकही अशामुळे नाराज होतात. रंकाळा ही आपली शान आहे ती जोपासण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. रंकाळ्याचे साैंदर्य फुलविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. यातून पर्यटन विकासासही चालना मिळू शकेल.

Web Title: Esakal Citizen Journalism Kolhapur Problems on Rakala