नाशिकमध्ये रविवार कारंजा परिसरात वाहतुक कोंडी

स्वप्नील येवले
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

आपणही व्हा सिटिझन जर्नालिस्ट...
'सकाळ संवाद' मोबाईल अॅप डाऊनलोड करा आणि आपल्या भागातील बातमी शेअर करा. 

अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

iOS अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

(सूचना : आपले पूर्ण नाव रजिस्टर करा किंवा सोशल मीडिया प्रोफाईलने लॉगीन व्हा. आपली बातमी आपल्या नावावर प्रसिद्ध होण्यासाठी हे आवश्यक आहे.)

नाशिक- शहरात प्रत्येक सणाच्या वस्तू विक्री साठी रविवार कारंजा भोवती विक्रेते आपली दुकाने थाटतात. या दुकानांमुळे रविवार कारंजा परिसरात नेहमी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन जनतेला त्रास सहन करावा लागतो. सदरचे विक्रेते माल विकून झाल्यावर उरलेला माल आणि कचरा कारंजा भोवतीच टाकून निघून जातात. या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. घटस्थापना झाली आता दसरा आणि दिवाळी या सणांना हे विक्रेते पुन्हा याठिकाणी दुकाने थाटतील. या अतिक्रमण करणाऱ्या आणि वाहतूक कोंडीस जबाबदार असणाऱ्या विक्रेत्यांवर महानगरपालिका व पोलीस आयुक्तांनी योग्य ती कारवाई करावी.

Web Title: esakal citizen journalism nashik karanja traffic issue