पुणे | हॅप्पी कॉलनीतील तुंबलेल्या गटारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

महादेव तांबोळे
बुधवार, 31 जानेवारी 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- हॅप्पी कॉलनी, कामत हॉटेलच्या शेजारील पदपथावर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पावसाळी गटार तुंबलेले आहे..संपूर्ण हॅपी कॉलनी परिसरात एकमेव पदपथ असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गटाराचे पाणी पूर्णपणे पदपथावर व रस्त्यावर कायम वाहत असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून तेथे प्रचंड प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून सुद्धा काहीही कार्यवाही होताना दिसत नाहीये. तरी स्थानिक प्रशासनाने व स्थानिक नगरसेवकांनी यात लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा.

Web Title: Esakal Citizen Journalism Pune happy colony drainage issue