रस्त्यावार प्राणी ठेवणे ही क्रुरता

विजय बोरगावकर
रविवार, 20 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणो : सकाळ मध्ये प्रसिध्द केलेले भटक्या कुत्र्यांबाबतच्या बातमीला पुणे महापालिकेने उत्तर दिले आहे. कदाचीत त्यांचे हात बांधलेले असतील. जर चावणे, मोटर सायकली मागे धावणे आपल्या मंत्रायला चालत असेल तर कठीण आहे. खर तर कोणत्या ही जनावराला रस्त्यावर येऊ देऊ नये ह्या मुळे अपघाताची शक्यता फार असते. कोणत्या ही प्रगत देशात हाच पायंडा आहे. 

पुणे महापालिकेचे उत्तर 

पुणे महानगरपालिकेचे कुत्रा बंदोबस्त विभागाचे कामकाज 'प्राणी जन्म नियंत्रण [कुत्रा] कायदा २००१' नुसार चालते. त्यानुसार भटकी व मोकाट कुत्री यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण केले जाते. भटक्या व मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात आलेली आहे. हे समजण्यासाठी त्यांच्या डाव्या कानाचा बाहयकर्णाच्या पुढे आलेल्या भागाचा किंचित व्ही आकाराचा भाग कापण्यात येतो . तदनंतर ५ दिवसांनी कुत्रे ज्या ठिकाणाहून पकडले गेले आहे. त्या ठिकाणी परत नेऊन सोडण्यात येते. पुणे महानगरपालिकाच्या श्वान पथकास हि कृत्ये करण्यास विनंती किंवा जबरदस्ती करु नये . 
१] स्तन पान करणाऱ्या मत व त्यांच्या पिल्लांना उचलणे.
२] ६ महिन्या खालील पिल्लांना उचलणे.
३] नसबंदी केलेल्या कुत्र्यांना उचलणे. 
४] एका जागेवरील कुत्र्यांचे नवीन जागेवर विस्थापना करणे 
५] भटक्या व मोकाट कुत्र्यांना हद्दपार करणे. 
६] कुत्री भुकंत आहेत आवाज करीत आहेत, झोप मोड होत आहे, परिसर अस्वच्छ करीत आहेत, मोटर सायकलच्या मागे जात आहेत, तसेच ८/१० मोकाट  कुत्री फिरताना दिसतात, अशा तक्रारी येतात. या तक्रारी नसून, भटक्या व मोकाट कुत्र्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहेत.  

 

 

Web Title: to keep animals on the road is cruelty