महासत्ता व्हायला...(कविता) 

tricolour_indian_flag
tricolour_indian_flag

सर्व शिक्षक पहिले सकारात्मक असले पाहिजे,
अंद्धश्रद्धेला न मानणारे
प्रत्येक विद्यार्थ्यांचे पालक असले पाहिजे,

महासत्ता व्हायला
विचार स्पष्टपणे सांगता अाले पाहिजे,
आपल्यावर जबाबदारी राष्ट्राची
हे कणाकणात मनातून रूजले पाहिजे,

भ्रष्टाचार नाव तर सोडाच
हा शब्दच हद्दपार झाला पाहिजे,
वाटण्यांनी ऱ्हास होतो
नात्यांमधे गोडवा आला पाहिजे,

तू हेच शिक्षण निवडावं
अशी जबरदस्ती नसायला पाहिजे,
आपण ठरवतो स्पर्धेचा दर्जा
पण सुंदरता जिवनाची कळली पाहिजे,

राजकारण्यांचं आश्वासन
त्याचं शवासन नाही झालं पाहिजे,
आज बोल नी उद्या काम
कामगाराला लगेच दाम पाहिजे,

दिमाखात करून सोहळे
जिरवणे बंद झाले पाहिजे,
एकजूट महत्वाची हे
आम्ही समजले आता पाहिजे,

महासत्ता होणं
सोपही नाही अन् अवघडही नाही,
पण त्याकरता प्रत्येकाने
घामासारख योग्य रक्त गाळलं पाहिजे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com