कचरा वाहक गाड्यांना झाकण नाही

आकांशा गोसावी 
मंगळवार, 3 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : शहरातील कचरा घेऊन जाणा-या ट्रकला कोणत्याही प्रकारचे झाकण नसते. हे ट्रक्स गर्दीच्या रस्त्यावरुन जातात. त्यातील जागोजागी कचरा पडतो. कित्येकदा हा कचरा आजुबाजुच्या दुचाकीधारक, पादचाऱ्यांच्या अंगावर पडतो. त्या कचऱ्यावर कावळे, घार, माश्या घोंगावत असतात. यामुळे रोगांचा संसर्ग आणि प्रदूषण होऊन आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे पावसाळ्यात अधिक रोग पसरू शकतात. आपल्या शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि कमीत कमी स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे. खुल्या कचरा वाहक गाड्यांना व्यवस्थित झाकवे अशी महापालिकेला विनंती आहे.

Web Title: no lid for garbage Carrier vehicle