दिवाळी पहाटला सारसबागेतील अपप्रकारांकडे पोलीसांनी लक्ष द्यावे

अॅड.गिरिष भोसले
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

पुणे : सारसबागमध्ये दिवाळी पहाटला होणारी गर्दी व अपप्रकारांकडे पोलीस व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. सारसबाग येथे अनेक वर्षे दिवाळी पहाटला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. गर्दीचा फायदा घेऊन महिलांना व मुलींना छेडछाड करणे, गर्दीच्या ठिकाणी फटाके उडवणे, प्रवेशद्वारावर होणारी चेंगराचेंगरी आणि किरकोळ चोरीचे प्रकार दरवर्षी घडत असतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून होणारी तुडुंब गर्दी आणि गैरप्रकार पाहता पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
 
Web Title: Police should pay attention to Sarasbagh at Diwali