मंडई पे अॅंड पार्क सुविधेचे खाजगीकरण

सुनिल दासवेकर
Thursday, 3 January 2019

मंडई : मंडई पे अॅंड पार्क ही एक अत्यंत चांगली सोय पुणे मनपाने केली आहे. परंतु असे निदर्शनास येते की तिथला कंत्राटी कर्मचारीवर्ग आपल्या खाजगी जागेत उपक्रम चालत असल्यासारखा वागतो. दुचाकी वाहनांना रू.२ प्रती तास दर असताना पाच रूपये दिले असता दर वाढले आहेत सांगुन पैसे परत देत नाही. पावतीवरील दराबाबत प्रश्न विचारल्यावर उद्दामपणे पाच रूपये परत केले. नागरिक या सुविधेसाठी योग्य ठरलेली रक्कम देण्यास तयार असताना मनपाचे उत्पन्न नाकारण्याचा अधिकार कसा? तसेच मेंटेनन्स अधिकार्यांचा संपर्क क्रमांक बुजवलेला दिसला. संबंधितांनी योग्य दखल घ्यावी.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Privatization of the Pay and Park facility in